जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी चौघांना अटक

पाथरी : पोलीसनामा ऑनलाईन – तालुक्यातील गुंज (खुर्द) येथे गुढीपाडव्या निमित्त भरलेल्या याञेत अवैधरीत्या गुडगुडी नावाचा जुगार का खेळू दिला नाही या कारणावरून गुंज (खुर्द) येथील एका व्यक्तीला धारदार शस्त्र, लोखंडी गजाने मारहाण केल्या प्रकरणी पाथरी पोलीसात गुन्हा दाखल झाल्याने चौघांना 24 एप्रिल रोजी अटक करण्यात आली आहे.

पाथरी-माजलगाव महा मार्गावरील रायगड धाब्यावर हा प्रकार घडला.

पाथरी तालुक्यातील गुंज (खुर्द) येथील रहिवासी असलेल्या फिर्यादी अंकुश दत्तात्रेय तांगडे हे धाब्यावर गेले असता आरोपी निखिल नारायण गिराम, बाळू उद्धव आवसकर, भागवत आगे, शिवाजी परदेशी यांनी याञेतील राग मनात धरून धारदार शस्त्र, लोखंडी गजाने बेदम मारहाण केल्याने अंकुश तांगडे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी  परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात  दाखल करण्यात आले उपचार सुरू असताना फिर्यादीने दिलेल्या जवाबा वरुन पाथरी पोलीसात वरिल सर्व आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद झाल्याने बुधवार,  24 एप्रिल रोजी  पोलीस उपनिरीक्षक भिमराव कांबळे यांनी आरोपींना अटक केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like