बिबट्याच्या कातड्याची तस्करी करणाऱ्या ४ जणांना अटक, २० लाखाचे कातडे जप्त

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – बिबट्याचे कातडे विक्रीसाठी घेऊन आलेल्या चौघांना वन विभागाने अटक करुन त्यांच्याकडून २० लाखांचे कातडे जप्त केले आहे. या चौघांनी हे बिबट्याचे कातडे रोहा तळा येथून आणल्याची कबुली दिली आहे. बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या क्षेत्रातील येऊर येथील मधुबन गेटजवळ सापळा रचून या चौघांना बुधवारी रात्री साडेनऊ वाजता पकडण्यात आले.
बशीर महंमद पठाण, जावीद दाऊद पठाण (वय ४२, दोघे रा. तळा, रायगड), किरण किसन राऊत (वय ४२,रा. निवी, वरसे, ता. रोहा, रायगड) आणि मधुकर रामचंद्र कंक (वय ४९, रा. भुवनेश्वर, वरसे, ता. रोहा, रायगड) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत.

याबाबत येऊर वन परिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पवार यांनी सांगितले की, येऊर प्रवेशद्वार येथे बिबट्याचे कातडे विकण्यासाठी काही जण येणार असल्याची माहिती बुधवारी मिळाली होती. त्यानुसार तपासणी सुरु केली होती. बुधवारी रात्री साडेनऊ वाजता चौघे जण एका गाडीतून तेथे आले. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांच्या गाडीची तपासणी केल्यावर त्यात सुमारे २० लाख रुपये किंमत असलेले बिबट्याचे कातडे मिळाले. त्यांच्याविरुद्ध वन अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

कच्ची पपई यकृतासाठी उत्तम, इतरही आहेत अनेक फायदे

झटपट वजन कमी करण्यासाठी ‘या’ पदार्थाचे करा नियमित सेवन

प्रसूतीनंतर या ” कारणामुळे ” गळतात केस

मलावरोध ही समस्या अनेक गंभीर आजारांचे उगमस्थान