चौघांनी मुलीला एका खोली ओढत नेलं, एकानं कुलूप लावलं अन् पुढे झालं ‘असं’ काही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशातील झाशीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे. क्लासला चाललेल्या या मुलीला चार मुलांनी जबरदस्ती ओढून नेत एका खोलीमध्ये बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीचा आरडाओरडा ऐकल्यानंतर नागरिकांनी मुलीला वाचवले.

मिळालेल्या माहितीनुसार, झाशीमधील चिरगांव भागात क्लासला जाणाऱ्या या मुलीला चार मुलांनी पकडून जबरदस्ती एका खोलीत नेले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी याची भनक नागरिकांना लागल्याने त्यांनी दरवाजा तोडून या मुलीचा जीव वाचवला. त्यानंतर मुलीने आपल्या वडिलांना सर्व घटना सांगितली. त्यानंतर मुलीच्या सांगण्यावरून पोलिसांनी चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पीडितेच्या सांगण्यावरून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

दरम्यान, पोलिसांनी या आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांच्या तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचबरोबर लवकरच आरोपी सापडतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

Visit : Policenama.com 

You might also like