‘त्या’ शपथविधीला फडणवीसांसाठी धावून आलेल्या 4 उच्चपदस्थ अधिकार्‍यांचे ‘धाबे’ दणाणले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी बहुमताच्या परीक्षेला सामोरे जाण्याआधीच राजीनामा दिला होता. त्यानंतर महाविकास आघाडीनं सत्तास्थापनेचा दावा केला. नव्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रं होती घेताच फडणवीस सरकारमधील प्रकल्पांना ब्रेक लावणारे काही निर्णय घेतले आहेत. त्यामुळे फडणवीसांच्या शपथविधीला उपस्थित राहिलेल्या आणि त्यावेळी अतिशय सक्रियपणे काम केलेल्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या कालावधीत भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांच्या मदतीला धावून आलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना आता भविष्याची चिंता सतावत आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली त्यावेळी मुख्य सचिव अजॉय मेहता यांच्यासह अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाचे अधिकारी, प्रधान सचिव आणि सचिव दर्जाचे अधिकारी राजभवनात उपस्थित होते. राज्याचे मुख्य सचिव अजॉय मेहता 21 नोव्हेंबरपासून सुट्टीवर होते. अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याकडे जबाबदारी सोपवून मेहता मुंबईबाहेर गेले होते. मात्र देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार शपथ घेणार असल्याची माहिती मिळताच त्यांनी सुट्टी रद्द केली. याविषयीची माहिती एका इंग्रजी वृत्तपत्राने दिली आहे.

‘केंद्र सरकारचे 40 हजार कोटी वाचवण्यासाठी फडणवीस चार दिवसांचे मुख्यमंत्री झाले : भाजपा खासदाराच्या दाव्याने खळबळ –
महाविकास आघाडीच्या सरकारकडून केंद्र सरकारच्या 40 हजार कोटी रुपयांच्या निधीचा गैरवापर होऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीस यांना बहुमत नसतानाही मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली होती. फडणवीस हे मुख्यमंत्री बनले आणि त्यानंतर 15 तासांत त्यांनी 40 हजार कोटी रुपये पुन्हा केंद्राकडे पाठवून दिले. ही योजना पूर्वीपासूनच भाजपाने बनवून ठेवली होती. ही योजना अंमलात आणण्यासाठीच देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. असा दावा काल भाजपा खासदार अनंतकुमार हेगडे यांनी केला आहे. यामुळे खळबळ निर्माण झाली आहे.

Visit : policenama.com