बनावट मेडिकल चालकाला ठाण्यात अटक 

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – डी-फार्मसीचे बनावट प्रमाणपत्र बनवून  केमिस्टचा व्यवसाय करणाऱ्या चार दुकानदारासह बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या संस्था चालकालाहि पोलीसांनी अटक केली आहे. ठाणे गुहे शाखेच्या युनिट-१ने हि कार्यवाही केली असून अटक केलेल्या सर्वांच्या विरोधात कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखेचे अधिकारी करत आहेत. तर त्या सर्व आरोपींना न्यायालयाने २४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

आरोपी अरविंदकुमार लाछिराम भट याचे  खोपट या ठिकाणी आदर्श नावाने मेडिकल आहे. तर आरोपी राजू दशरथ यादव याचे दिवा भिवनदी या ठिकाणी जय मेडिकल आहे. तर आरोपी बुधाराम बभूतराम आजेनिया याचे काल्हेर भिवंडी या ठिकणी सेन्ट्रल मेडिकल या नावाने औषध दुकान आहे. आरोपी बलवंतसिंह खुशालसिंह चौहानचे मनोरमानगर ठाणे या ठिकाणी महावीर मेडिकल या नावाने औषध दुकान आहे.

मेडिकल चालवण्याचा परवाना घेण्यासाठी दुकानदाराचे शिक्षण फार्मसी क्षेत्रात झालेले असावे लागते या संदर्भात आपल्या देशात कायदेशीर बंधन आहे. मात्र पकडण्यात आलेले आरोपी हे दहावी अथवा बारावी उत्तीर्ण असल्याचे पोलीसांनी दिलेल्या माहितीवरून उघड झाले आहे.

दीप पॅरामेडिकल ऑर्गनायझेशन या शिक्षण संस्थेत विनाअट डी फार्मसीसाठी प्रवेश दिला जातो. हि संस्था ठाण्याच्या ढोकाळी परिसरात आहे. व्यक्तीने शिक्षण संस्थेत प्रवेश घेताच त्या व्यक्तीला काही दिवसातच माध्यमिक शिक्षा परिषद महाराष्ट्र, माध्यमिक शिक्षा परिषद उत्तरप्रदेश, माध्यमिक शिक्षा परिषद अजमेर, नवी दिल्ली यसंस्थांची बनावट प्रमाणपत्रे वाटण्यात येतात. संस्थचे चेअरमन पुरुषोत्तम ताहिलरामानी या व्यक्तीच्या पुढाकाराने हे बनावट प्रमाणपत्र वाटण्याचे काम चालू होते हे पोलीस तपासातून पुढे आले आहे.

गुन्हे शाखेने शिक्षण संस्थेचा प्रमुख  पुरुषोत्तम ताहिलरामानी याला हि बेड्या ठोकल्या आहेत. सर्व प्रमाणपत्र वाशी येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या कार्यालयात पोलीसांनी तपासली असता. ती प्रमाणपत्रे बनावट असल्याचे उघड झाले आहे. दीपाकर घोष यांनी दाखल केलेल्या तक्रारी वरून सदरची कार्यवाही करण्यात आली आहे.