भीषण अपघात : दर्शनासाठी निघालेल्या एकाच कुटुंबातील 4 जणांचा जागीच मृत्यू

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – बीड-माजलगाव-परभणी रोडवर झालेल्या ट्रक आणि दुचाकीच्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना गुरूवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. पाडव्यानिमित्‍त देव दर्शनासाठी जात असताना हा भीषण अपघात घडला असून अपघातात इतर दोघेजण जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

दयानंद गणेश सोळंके (40), त्यांची पत्नी संगिता सोळंके (36), मुलगी राजनंदनी (7) आणि मुलगा पृथ्वीराज (5) यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. माजलगाव तालुक्यातील गंगामसला येथील रहिवासी असलेले आणि सध्या माजलगावमध्ये रहावयास असलेले दयानंद सोळंके हे गावाकडे पाडव्यानिमित्‍त मोरेश्‍वराच्या दर्शनासाठी जात असताना हा अपघात घडला आहे. दयानंद हे जाम समर्थ येथे एका खासगी बँकेत नोकरीला होते. दिवाळी सण म्हटल्यानंतर जो-तो आपल्या मुळ गावी जातो. त्यामुळे सोळंके देखील आपल्या मुळ गावी दर्शनासाठी निघाले होते.

माजलगावपासुन तीन-चार किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्ग 222 येथे छत्रपती सहकारी साखर कारखान्याची साखर घेवुन जात असलेला ट्रक भरधाव वेगात होता. ट्रकसमोर अचानक एक दुचाकी समोर आली. त्या दुचाकीस्वाराचे प्राण वाचविण्यासाठी ट्रकचालकाने ट्रक वळविली आणि वेगळात असलेली ट्रक शेजारून जाणार्‍या दुचाकीवर पडली. त्यामध्ये सोळंके कुटूंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. सोळंके कुटुंबावर पाडव्याच्या दिवशी शोककळा पसरली आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us