अहमदनगर : ट्रक-कारच्या भीषण अपघातात चार ठार

अहमदनगर :  पोलीसनामा ऑनलाइन – नगर-दौड महामार्गावर बाबुर्डी बेंद परिसरात रात्री अडीचच्या सुमारास ट्रक आणि कारच्या झालेल्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले. नगर-दौड महामार्गावरील बाबुर्डी बेंद परिसरातील महादेव वस्ती जवळ हा अपघात झाला.
अनिरुद्ध भुजबळ (रा. एमए कॉलनी, वडारवाडी), शुभम खेडकर (रा.वाळकी) असिफ पठाण (रा. नागरदेवळे) व गोपीनाथ कुऱ्हाडे (रा. वडारवाडी) ही मयतांची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी की, मध्यरात्री दीडच्या सुमारास नगर-दौंड मार्गावरील बाबुर्डी बेंद शिवारात ट्रक (एमपी 09 एचएच 8378) व कार (एम एच 04 बिवाय 4857) यांचा समोरासमोर भीषण अपघात झाला.
श्रीगोंद्याहून नगरकडे येत असताना हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी धाव घेतली. कार्ले यांच्यासह सरपंच दीपक साळवे, शरद चोभे, मिनीनाथ चोभे, राघू
चोभे, मणेश भोसले यांनी अपघातग्रस्तांना सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात मदत केली.

 

 

Visit : policenama.com