औरंगाबाद – नगर महामार्गावर कारचा भीषण अपघात, 4 जागीच ठार

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – औरंगाबाद-नगर महामार्गावर भरधाव कार झाडावर आदळून अपघात झाला आहे. या भीषण अपघातात चार जणांचा जागेवरच मृत्यु झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार,  औरंगाबाद-नगर महामार्गावर भरधाव कार झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागेवरच मृत्यु झाला. तर दोन जण गंभीर जखमी आहेत. दत्ता डांगे, अक्षय शीलवंत, अक्षय मोरे, अमोल गवळकर अशी मृतांची नावे असून किरण गिरी, व अन्य एक जखमी झाला आहे. जखमींना घाटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सर्वजण जालना जिल्ह्यातील शेवली येथील रहिवाशी आहेत. मात्र हा अपघात कसा झाला याबद्दल अद्याप पूर्ण माहिती मिळालेली नाही.

Visit : Policenama.com