धक्कादायक…. चारही विचारवंताच्या हत्येमागे एकच मास्टरमाईंड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन 
नालासोपारा शस्त्रसाठा  प्रकरणी वैभव राऊतला अटक केल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर येवू लागले आहेत. राज्याच्या विविध भागातून राऊतच्या संपर्कात असणाऱ्या तरुणांची तपास यंत्रणांनी धरपकड करायला सुरूवात केली असून, यामध्ये मराठवाड्यातील तिघांचा समावेश आहे. पत्रकार गाैरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अमोल काळे याने चाैकशी दरम्यान अनेक महत्वाचे खुलासे केले आहेत. मागील पाच वर्षामध्ये झालेल्या चारही विचारवंतांच्या हत्या या एकाच टोळीने केल्या असून, त्याचा मास्टरमाईंड सुद्धा एकच आहे. आणि हे सर्वजन महाराष्ट्रातील असल्याची माहिती त्याने चाैकशीच्या वेळी दिली आहे.
डाॅ. नरेंद्र दाभोलकर, काॅम्रेड गोविंद पानसरे, पत्रकार गाैरी लंकेश आणि जेष्ठ विचारवंत एम.एस.कलबुर्गी यांच्या हत्या मागील पाच वर्षात ठरावीक कालावधीने झाल्या. या चारही हत्येमधील हत्या करण्याची पद्धती एकसारखीच होती. त्यामुळे या चारही हत्या एकाच कट्टर विचारसरणीच्या गटाकडून झाल्या असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
दाभोळकर हत्ये प्रकरणी अटकेत असलेला विरेंद्र तावडे आणि गाैरी लंकेश हत्ये प्रकरणी अटकेत असलेला अमोल काळे हे दोघे कटाचे मास्टरमाईंड असून, या दोघांनीच कट रचून त्याला अंजाम दिला असाल्याचा अंदाज पोलिसांना आहे. या हत्या करण्यासाठी मिशन अॅंटी हिंदू या नावाची योजना आखली होती. यामध्ये देशातील तब्बल 36 जणांना टार्गेट करण्यात आलं होते. यामध्ये महाराष्ट्रातील 16, कर्नाटकातील 10, आणि विविध क्षेत्रातील इतर 10 जण त्यांच्या निशाण्यावर होते.
डाॅ. दाभोलकर यांच्या हत्येसाठी शरद आणि सचिनची नावं अमोल काळेनेच सुचवली होती. दाभोलकर,पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश या चार जणांच्या हत्येनंतर सुद्धा  २ साहित्यिक, १ सीबीआयचा अधिकारी आणि एक महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी यांच्या रडारवर होते. या गटाने दाभोळकरांची हत्या यशस्वी झाल्यानंतर पुढील 3 जणांची हत्या करण्याचा कट रचण्यात आला. मात्र विरेंद्र तावडेच्या अटकेमुळे पुढील मिशन थांबवले गेले. एवढेच नाही तर विरेंद्र तावडेला बेड्या ठोकणारा सीबीआय अधिकारी आणि हिंदू संघटनांवर कारवाई करणारे पोलीस अधिकारी देखील त्यांच्या टार्गेटवर होते.