‘TikTok’ व्हिडिओच्या वादातून झाला ‘गोळीबार’, 4 जण ‘जखमी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या टिकटॉक व्हिडीओ ची चर्चा सगळीकडेच होताना दिसते. जो तो टिकटॉक व्हिडीओ बनवून आपली कला इतरांपर्यंत पोहोचवण्यात दंग असतो. तरुण वर्गात टिकटॉक ची प्रचंड क्रेज आहे. टिकटॉक व्हिडिओ बनवण्यासाठी कोण कुठल्या थराला याचा काही नेम नाही. सध्या टिकटॉक व्हिडिओ बनवण्यासाठी तरुण-तरुणी जीव धोक्यात घालायला सुद्धा मागे पुढे पाहत नाहीत.

मंगळवारी असाच एक थक्क करून सोडणारा प्रकार घडला. यामध्ये टिकटॉक व्हिडिओ बनवणाऱ्या एका ग्रुपने दुसऱ्या ग्रुपवर गोळीबार केला. आणि या गोळीबारात चार जण गंभीर जखमी झाले. अशा घटना सऱ्हास घडत असतात. टिकटॉकच्या नादात अनेक तरुण तरुणी आपल्या जीवाची पर्वा न करता प्रसिद्धीसाठी नको ते साहस करत असतात. आणि यातूनच वैर निर्माण होऊन त्याच्यापेक्षा आम्ही सरस अशी भावना ठेऊन वाद होत असतात.

या जखमी झालेल्या तरुणांना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. रवी शर्मा (वय २५ वर्ष), राजेंद्र (वय ४६ वर्ष), हिमांशू पाल (वय २१ वर्ष) आणि संजीव कुमार (वय २१ वर्ष) अशी जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत.

झालेल्या प्रकाराबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, २९ नोव्हेंबर रोजी एका लग्न समारंभात हे दोन्ही ग्रुप एकत्र आले होते. त्या ठिकाणी व्हिडीओ शूटिंगच्या दरम्यान एका ग्रुपने दुसऱ्या ग्रुपला शूट करण्यापासून रोखले. यातूनच त्यांच्या भांडणाला सुरुवात झाली. लग्नसमारंभात आरोपी असलेल्या ग्रुपने पीडित ग्रुप ला व्हिडीओ शूट करण्यापासून रोखले होते. झालेल्या प्रकारानंतर दुसऱ्या दिवशी आरोपी ग्रुपने पीडित ग्रुपमधील एकाला मारहाण केली. त्यानंतर दुसऱ्या ग्रुपने बदला घेण्याचे ठरवले आणि ते राहत असलेल्या ठिकाणी ते गेले परंतु तेथे आरोपी ग्रुपमधील कुणी सापडले नाही त्यामुळे त्यांनी त्यातील एका मुलाच्या आईला शिवीगाळ केली. त्यातूनच मग पुढील प्रकार घडला.

मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री तीन मोटारसायकलस्वार पीडितांच्या ग्रुपजवळ पोहोचले. आणि त्यांनी पीडितांच्या घराचा दरवाजा ठोठावला. त्यांनी दरवाजा उघडताच आरोपींनी त्यांच्यावर गोळीबार करत आठ गोळ्या झाडल्या. यात चार जण जखमी झाले असून त्यांना दवाखान्यात हलवण्यात आले आहे. आरोपींवर कलम ३०७ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे असे पोलिसांनी दिलेल्या माहितीतून समोर आले आहे.

फेसबुक पेज ला लाईक करा 👉: https://www.facebook.com/policenama/