पुलवामामध्ये दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत मेजरसह चार जवान शहीद

श्रीनगर : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरमधल्या पुलवाम्यात दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरू असून या चकमकीत एका मेजरसह चार जवान शहीद झाल्याची घटना घडली आहे. पुलवाम्यातील पिंगलान भागात दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला असून, जवानही त्याला चोख प्रत्युत्तर देत आहेत. दहशतवादी एका घरात लपून बसले असून, तिथूनच ते जवानांवर गोळीबार करत आहेत.

पुलवाम्यात १४ फेब्रुवारीला दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या एका बसवर हल्ला केला होता. त्यात ४० जवान शहीद झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने स्वीकारली होती. त्यानंतर काश्मीरमध्ये सुरक्षा जवानांनी जोरदार सर्च आॅपरेशन राबवलं असून, याचदरम्यान ४ दहशतवादी पिंगलान येथे लपून बसल्याची माहिती जवानांना मिळाली. जवानांनी परिसराला चारही बाजूंनी घेरले असून, दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक सुरू आहे.

You might also like