दुर्देवी ! सियाचीनमध्ये ‘हिमस्खलन’ झाल्यानं 4 जवान शहीद

श्रीनगर : वृत्तसंस्था – सियाचीनमध्ये सोमवारी दुपारी हिमस्खलन होऊन बर्फाच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याने चार जवान शहीद झाले आहेत. तसेच दोन पोर्टरचा मृत्यू झाला आहे. तर गस्तीपथकातील 8 जवान दबले गेले आहेत. सियाचीनमधील लष्कराच्या चौकीजवळ हे हिमस्खलन झाले असून हे ठिकाण समुद्र सपाटीपासून सुमारे 18 हजार फूट उंचीवर आहे. सैनिकांनी घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू केले आहे.

लष्कराच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास हिमस्खलनामध्ये गस्त घालणारे जवान अडकले. याबाबची माहिती मिळताच लष्कराचे एक पथक जवानांच्या शोधासाठी घटनास्थळी झाले असून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.

सियाचीन ही जगातील सर्वात उंचीवरील युद्धभूमी म्हणून ओळखली जाते. हिवाळा सुरू झाल्यानंतर कारकोरम भागातील हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होतो. गेल्या काही दिवसांपासून या भागात तुफान बर्फवृष्टी होत आहे.

Visit : Policenama.com