भांडी धुण्यासाठी बंधाऱ्यावर गेलेल्या एकाच कुटुंबातील ४ जणांचा बुडून मृत्यू

नाशिक :पोलीसनामा ऑनलाईन

त्रंबकेश्वर रस्त्यावर बेळगाव ढगा शिवारात पाझर तलावात बुडून एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. ऐन गणेशोत्सवाच्या दिवशीच ही घटना घडल्याने  सातपूर परिसरावर शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेतील मृतांमध्ये तीन युवतींचा आणि एक महिलेचा समावेश आहे. मृत भांडी धुण्यासाठी बंधाऱ्यावर गेले होते.
[amazon_link asins=’B07D11MDBS,B0785JJF7L’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3a3f82ad-b774-11e8-8003-f7801834e76c’]

मनीषा अरुण शिंदे, वृषाली अरुण शिंदे, ऋतुजा अरुण शिंदे आणि आरती निलेश शिंदे अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

महाराष्ट्रात सर्वत्रच बाप्पाचं जल्लोषात स्वागत करण्यात येत असतानाच, नाशिकमध्ये मात्र एक दुःखद घटना घडली आहे. सातपूरच्या बेळगाव ढगा परिसरात शिंदे नामक एक कुटुंब राहत असून, आज सकाळी त्यांच्या घरी वाजत गाजत बाप्पाचं आगमन झालं. दुपारी मनीषा शिंदे या आपल्या दोन लहान मुलींसह सूनेला घेऊन भांडी घासण्यासाठी जवळीलच एका बंधाऱ्यावर गेल्या होत्या. काम आटोपल्यावर पाय धुवत असतांनाच एका मुलीचा पाय घसरल्याने ती पाण्यात पडली आणि तिला वाचवण्याच्या प्रयत्नात पाण्याच्या पातळीचा अंदाज न आल्याने इतर तिघीही यात बुडाल्या.
[amazon_link asins=’B01BKEZYBY,B071D4MP9T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3fb42533-b774-11e8-8ab8-c1aab6ccd507′]

विशेष म्हणजे, घरातीलच एक लहान मुलगी या परिसरात खेळत असताना तिने हा सर्व प्रकार बघून घरातील इतर सदस्यांना याबाबत माहिती दिली आणि स्थानिक नागरिकांसह परिवारातील इतर सदस्यांनी इथे धाव घेत त्यांचा शोध घेऊन चारही जणींना बाहेर काढलं आणि त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवलं, मात्र उपचार सुरु होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

सातपूर पोलिस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूच्या नोंदणीच काम सुरु असून गणेश चतुर्थीच्या दिवशीच काळाने शिंदे कुटुंबावर घाला घातला आहे. या घटनेनंतर परिसरात शोककला पसरली आहे.

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी