‘मेगा’ भरती झाली ! काँग्रेस – राष्ट्रवादीच्या ४ आमदारांसह अनेक कार्यकर्त्यांची भाजपात ‘एन्ट्री’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – विधानसभेच्या तोंडावर आज भाजपमध्ये अनेक आमदारांनी प्रवेश केला असून यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तीन आमदार असून एका काँग्रेस आमदाराचा समावेश आहे. या आमदारांमध्ये शिवेंद्रसिंहराजे भोसले, संदीप नाईक, मधुकर पिचड, त्यांचे पुत्र वैभव पिचड, आणि काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांचा समावेश आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी देखील आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

या आमदारांबरोबरच अनेक कार्यकर्त्यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुबईतील गरवारे क्लबमध्ये हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. मुख्यमंत्र्यांबरोबरच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजपचे अनेक नेते उपस्थित होते. याआधी या आमदारांनी काल आपल्या आमदारकीचा राजीनामा देत पक्षातून बाहेर पडल्याची घोषणा केली होती.

याआधी देखील मुंबईचे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सचिन अहिर यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आजून देखील आमदार पक्ष प्रवेशासाठी इच्छुक असल्याचे भाजपच्या वतीने सांगण्यात येत असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतेत भर पडली आहे. आज या आमदारांच्या भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादीला मोठे भगदाड पडल्याचे दिसून येत आहे. साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी या प्रवेशाविषयी बोलताना सांगितले कि, मी पवार साहेबांना या विषयी अगोदरच कल्पना दिली होती. त्याचबरोबर मतदारसंघात मला पक्षातूनच त्रास दिला जात असल्याने मो भाजप प्रवेशाचा निर्णय घेतल्याचे म्हटले.

दरम्यान, या चार आमदारांच्या प्रवेशानंतर आता आणखी किती आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

७ दिवसात आत जाऊ शकते पोट, ‘हे’ ११ उपाय आहेत ‘रामबाण’
आरोग्य समस्यांवर ‘हे’ १० छोटे-छोटे घरगुती उपाय, जाणून घ्या
भारतात HIV पेक्षाही ‘हिपॅटायटीस’ अधिक घातक, पावसाळ्यात विशेष काळजी घ्या
‘सेक्स पॉवर’ कमी झाल्यास बिघडू शकते वैवाहिक जीवन, करा ‘हे’ खास उपाय
अशाप्रकारे परत मिळू शकते त्वचेची चमक, ‘हे’ ४ उपाय आवश्य करा
औषधी न घेता आहाराने लिव्हर ठेवा ठणठणीत, जाणून घ्या ११ उपाय