मरण्यापूर्वी शेवटच्या वेळी बोलला, ‘तुमचा गुडघा माझ्या मानेवर आहे, मी श्वास नाही घेऊ शकत…’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेच्या मिनियापोलिस शहरात पोलिसांच्या तोडफोडीत एका आफ्रिकन वंशाच्या अमेरिकन व्यक्तीचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये एका माणसाला हतकडी लावली आहे आणि तो जमिनीवर उलटा पडला आहे. एक पोलिस अधिकारी पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ आपला गुडघा त्याच्या मानेवर ठेवून आहे. नंतर त्या माणसाचा मृत्यू होतो. चारही पोलिसांना काढून टाकले आहे.

जॉर्ज फ्लॉयड असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अमेरिकेत बर्‍याच ठिकाणी या मुद्द्यावरून निषेध सुरू झाला आहे. तर मिनियापोलिसचे महापौर जॅकब फ्रे यांनी जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यूनंतर चार पोलिस अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई केली आहे. व्हिडिओमध्ये पाहता येऊ शकते की, जवळजवळ ४० वर्षांचा जॉर्ज पोलिस अधिकाऱ्याला गुडघा काढायला सांगत आहे. तो म्हणतो, ‘तुमचा गुडघा माझ्या मानेवर आहे, मी श्वास घेऊ शकत नाही…’, हळूहळू त्याची हालचाल थांबते. यानंतर अधिकारी म्हणतो ‘उठ आणि गाडीत बस’, पण जेव्हा काही हालचाल झाली नाही तेव्हा त्याला दवाखान्यात नेले जाते. तिथेच त्याचा मृत्यू होतो.

फसवणूकी मध्ये पकडले होते
मिनियापोलिसच्या महापौरांनी या घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत सांगितले की, अधिकाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. दुसरीकडे नागरी हक्कांचे वकील बेन क्रंप म्हणाले की, फ्लॉइडला पोलिसांनी फसवणूकी प्रकरणी पकडले होते. त्याच्यावर बनावट चेक देणे आणि बनावट नोटा वापरल्याचा आरोप होता. हा काही हिंसक गुन्हा नव्हता, परंतु पोलिसांनी अमानुषपणाने शक्तीचा गैरवापर करून त्याची हत्या केली.

खुनाचा गुन्हा दाखल करावा
मिनीयापोलिसचे पोलिस प्रमुख मॅडारिया एराडोंडो म्हणाले की, हे प्रकरण एफबीआयकडे सोपवण्यात आले आहे. अधिकारांच्या चुकीच्या वापरासाठी पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, परंतु निषेध करणार्‍या लोकांची मागणी आहे की अधिकाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा. त्याच्याशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांवरही खुनाचा गुन्हा दाखल केला पाहिजे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like