खळबळजनक : ‘गो तस्करी’च्या आरोपावरून करायला लावले हे घृणास्पद कृत्य

हरियाणा : वृत्तसंस्था – देशात याआधी मॉब लिंचिंगचा प्रकार घडले असतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. हरियाणातील फतेहाबादमध्ये गो तस्करीच्या आरोपावरून ४ जणांना मारहाण करण्यात आली. यामध्ये चार लोक असून त्यांना मृत गायीची तिच्या वासराची कत्तल करताना पकडण्यात आलं.त्यांना कपडे काढून मारतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून चारही आरोपींविरोधात गो संरक्षण कायद्यांतर्गत FIR दाखल करण्यात आली. आरोपींना रूग्णालयात दाखल करण्यात आलं. असून पुढील तपास पोलीस करत आहेत. या मारहाणीत चारही जणांना किरकोळ जखम झाली असून पोलिसांनी मृत गाय आणि वासरू पोस्टमॉर्टमसाठी पाठवलं आहे.

घडलेल्या घटने विरोधात दलित अधिकार मंचाने मारहाण करणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी केली आहे.दलित अधिकार मंचाचे संजोयक बेगराज सिंह यांनी मारहाण करण्यात आलेले चारही लोक मेलेल्या जनावरांची विल्हेवाट लावण्याचं काम करतात.सर्वजण दलित समाजातून असल्याची माहिती दिली.
आणि ते विल्हेवाट करत असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.

आरोग्य विषयक वृत्त – 

रेल्वे प्रवाशांना शंभर रूपयात मसाज सुविधा

हे’ घरगुती उपाय केल्यास नाभी इन्फेक्शन होऊ शकते दूर

औरंगाबादेतील कॅन्सर हॉस्पिटलची क्षमता वाढणार ; १०० खाटांचे रुग्णालय २६५ खाटांचे