खेड-शिवापूर टोलनाक्याजवळ भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू

पुणे  : पोलीसनामा ऑनलाईन

भरधाव वेगात जाणाऱ्या कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला उभारलेल्या ट्रकला पाठिमागून धडकून झालेल्या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. हा भीषण अपघात आज (सोमवार) दुपारी तीनच्या सुमारास पुणे-बंगळूर महामार्गावरील खेड-शिवापूर टोलनाक्याजवळ झाला.

या अपघातात कारचालक ओंकार पोळ याच्यासह अरुणा भोसले, उज्वला सणस आणि अश्विनी असवले, अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.
[amazon_link asins=’B015QWEHLO’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f30a1a8c-7881-11e8-8f38-99e73633f0bb’]राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याहून साताऱ्याला जाणाऱ्या आयटेन कारमध्ये कारचालक ओंकार पोळ याच्यासह अरुणा भोसले, उज्वला सणस आणि अश्विनी असवले या तीन महिला महिला प्रवास करत होत्या. खेड-शिवापूर टोलनाक्यापूर्वी 500 मीटर अंतरावर एक ट्रक उभा होता.दरम्यान, कारचालक ओंकार पोळ याचे नियंत्रण सुटल्याने ट्रकवर पाठीमागून आदळली.हा अपघात इतका भीषण होता की ही कार ट्रकमध्ये जाऊन फसली. या कारला क्रेनच्या सहाय्याने ओढून काढावे लागले. चालकासह जखमी झालेल्या तीनही महिलांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले.