इथे रंग खेळायचा नाही.! म्हणत चौघांची भावंडांना मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – धुळवडीनिमित्त मित्रासोबत रंग खेळणाऱ्या तरुणांना, इथे रंग खेळायाच नाही.! असे म्हणत चार जणांनी लाकडी स्टंपने मारहाण केल्याची घटना आंबेगाव बु. येथे गुरुवारी दुपारी घडली.

याप्रकऱणी सोमेश पंडीतराव कलाणे (२१, आंबेगाव बु.) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार श्रीकांत कोयले, रोहीत ठोंबरे, माणिक विलास परदेशी, व एका अनोळखी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण आणि त्याचे मित्र धुलीवंदनानिमित्त काल आंबेगाव बु. येथे रंग खेळत होते. त्यावेळी श्रीकांत कोयले तेथे आला आणि त्याने येथे रंग खेळायचा नाही, असे म्हणत सोमेश आणि त्याचा भाऊ महेश याला हातापायावर कोयले आणि त्याच्या साथीदारांनी स्टंप मारून जखमी केले. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.