खुनाचा प्रयत्न करणार्‍या पिंपरी-चिंचवडमधील चौघांना अहमदनगर पोलिसांकडून अटक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – स्टेशन रस्त्यावर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पुण्यातील पिंपरी-चिंचवड परिसरातील चौघांची टोळी जेरबंद केली आहे. कोतवाली पोलिसांनी ही कारवाई केली.

आदित्य उर्फ निरंजन शाम अहिरराव (वय-२६ वर्षे, रा.काळेवाडी, पिंपरी चिंचवड, पुणे), स्वप्निल राजेंद्र गाडे (वय-२० वर्ष, रा.भिमनगर, पिंपरी चिंचवड, पुणे), अभिषेक नरेंसिंग माडगुळे (वय-१९ वर्षे, रा.ज्योतीबानगर, पिंपरी चिंचवड पुणे), अजय म्हस्के (वय-२० वर्षे रा. सद्गुरु कॉलनी, पिंपरी चिंचवड, पुणे) यांना गुन्हयात वापरलेली बलेनो कार नं. एम.ए.१४.जी.एन.७७१३ सह पुणे येथून वेगवेगळ्या ठिकाणावरुन अटक केले आहे.

याबाबत माहिती अशी की, गोरख मारुती गोरे (वय-२४ वर्षे, रा.शिवगंगा अपर्मिट, दाजी सुपर मार्केटच्यावरती, सारसनगर, नगर) यांच्या तक्रारीवरुन चार अनोळखी इसमांविरुध्द सोमवारी (दि. २७) गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना सदर गुन्ह्यातील पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत.