बिबट्याच्या हल्ल्यात ४ जण जखमी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन –संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर परिसरात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात चार जण गंभीर जखमी झाले आहेत. आज (दि. ६) ही घटना घडली.

कृष्णा वाल्मिक गायकवाड (वय- अडीच वर्ष), संजय जगन भडांगे (वय ४०), संजय भुजबळ व एकनाथ थेटे ही जखमी झालेल्यांची नावे आहेत. याबाबत समजलेली माहिती अशी की, कृष्णा हा अंगणात खेळत असताना पाठीमागून आलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. तेथे असलेल्यांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला. त्यांनतर सुमारे पाचशे मीटर अंतरावर असलेल्या जांभळीचा मळा येथे याच बिबट्याने संजय भडांगे यांच्यावर हल्ला केला.

जखमी झालेल्या दोघांना उपचारासाठी घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.त्यानंतर पाहणी करण्यासाठी गेलेल्या दोन वनमजुरांवर हल्ला केला. संजय भुजबळ व एकनाथ थेटे यांच्यावर बिबट्याने हल्ला केला.