‘लव्ह बर्ड’ पक्षांची तस्करी करणारे चारजण गजाआड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – परदेशी पक्षांची तस्करी करणाऱ्या चौघांना डीआरआयच्या पथकाने पकडले असून त्यांच्याकडून ३०० पक्षांची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई मुंबईतील विविध भागात एकाच वेळी करण्यात आली. या कारवाईत कोकाटूस, आफ्रिकन पोपट, लव्ह बर्ड, फ्लेमिंगो पक्षांची सुटका करण्यात आली आहे.

मुंबईतील ओपेरा हाऊस, क्रॉपर्ड मार्केट, चेंबूर, कुर्ला, कर्जत, गोवंडी, बैंगणवाडी परिसरात परदेशी पक्षांची विक्री करण्यात येत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान ३०० हून अधिक परदेशी पक्षांची सुटका करण्यात आली. हे पक्षी बेकायदेशीररित्या पाळल्याचे तपासात समोर आले आहे.

सुटका करण्यात आलेल्या पक्षांना बाजारात मोठी मागणी आहे. त्यामुळे या पक्षांची तस्करी मोठ्या प्रमाणात केली जाते. डीआरआयने केलेली ही कारवाई आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणात इतर आरोपींचाही सहभाग असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. डीआरआयच्या पोलिसांनी त्या अनुषंगाने तपास सुरु केला आहे.

आरोग्यविषयक वृत्त

स्मरणशक्‍ती वाढविण्यासाठी आणि व्यसन सोडवण्यासाठी ‘हे’ आसन कराच

‘सर्वांगासन’ केल्याने मिळते मनःशांती

महिलांसाठी ‘योग’साधना अतिशय महत्वाची

तुम्हाला तुमची ‘उंची’ वाढवायचीय, मग फक्‍त ‘हे’ असान कराच

वयोवृद्धांसाठी ‘योगा’ हे ‘वरदान’च

योगा कराच ! पण ‘हे’ नक्‍की समजून घ्या

‘योग’ साधनेची सुरुवात करा वज्रासनाने, मिळवा ‘हे’ फायदे

‘अपचना’चा त्रास असणाऱ्यांसाठी ‘हे’ आसन ठरतय ‘रामबाण’ उपाय