मुंबई : भीषण अपघातात रेस्टॉरंटमध्ये घुसली भरधाव कार, 4 जणाचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दक्षिण मुंबईत काल रात्री भीषण अपघात घडला. एक भरधाव कार नियंत्रण सुटल्याने जनता कॅफे रेस्टॉरंटमध्ये घुसली. गाडीचा वेग इतका प्रचंड होता की, रेस्टॉरंटचे दरवाजे तोडून कार आत घुसली. या भीषण अपघातात चार लोकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर 4 अन्य लोक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जेजे हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

सोमवारी रात्री उशीरा जेव्हा क्रॉफर्ड मार्केट परिसरात जनता कॅफ रेस्टॉरंटमध्ये लोक बसले होते, त्यावेळी अचानक एक भरधाव कार रेस्टॉरंटचा दरवाजा तोडून आत घुसली. कारचा वेग जास्त असल्याने चालकाला ती नियंत्रित करता आली नाही. या दुर्घटनेत ज्या 4 लोकांचा मृत्यू झाला, त्यामध्ये 3 महिला आहेत. जखमींबाबतची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी येऊन रेस्टॉरंटमधून जखमींना बाहेर काढले आणि जेजे हॉस्पीटलमध्ये दाखल केले. कारची स्थिती पाहून अंदाज येतो की, अपघात किती भीषण आहे. ही कार कोण चालवत होता, ही माहिती अद्याप मिळालेली नाही. पोलीस या अपघातचा तपास करत आहेत.