Bribery | लाचखोरीच्या आरोपावरून पोलिस उपनिरीक्षकासह चौघे तडकाफडकी निलंबीत

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – काळा बाजारात धान्याची विक्री (Grain black market) करण्यासाठी जाणारी गाडी पोलीस ठाण्यात लावून कारवाईचा धाक दाखवून लाखोंची तोड करणे तसेच एका तरुणाला बेदम मारहाण केल्याच्या आरोपावरुन यशोधरा नगर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकासह चौघांना निलंबित करण्यात आले.

पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास दराडे, हवालदार मनिष भोसले, पोलीस काँस्टेबल राजकुमार पाल आणि शिपाई प्रसेनजित जांभुळकर अशी निलंबित केलेल्यांची नावे आहेत.

धान्याचा काळा बाजार (Grain black market) करणारे वाहन पोलिसांनी पकडले़ कारवाईचा धाक दाखवून मोठी वसुली करण्यात आल्याची चर्चा पोलीस दलात सुरु होती.
हा प्रकार २७ व २८ मे रोजी झाला होता.
त्यातच एका उच्च शिक्षित तरुणाला बेदम मारहाण केल्याची तक्रार पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे केली गेली.
त्यांनी त्याची गंभीर दाखल घेऊन चौकशीचे आदेश दिले.
या चौकशीचा अहवाल सोमवारी आल्यानंतर अमितेशकुमार यांनी त्यांच्या निलंबनाचे आदेश काढण्याच्या सुचना वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना दिल्या.

पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी प्रत्येक पोलीस ठाण्यांना आपल्या हद्दीत अवैध धंदे बंद करावे.
खाबुगिरी करु नका असे कोणी आढळल्यास कडक कारवाईचे आदेश दिले होते.
असे असताना हे प्रकरण समोर आल्याने चौघांचे निलंबन करण्यात आले.

फायद्याची गोष्ट ! एकाच दिवसात बनाल ‘लखपती’, 14 ते 16 जूनपर्यंत बंपर कमाईची ‘सुवर्णसंधी’, जाणून घ्या

IBPS RRB PO/Clerk Notification 2021 | बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी ! 10466 पदांसाठी भरती, जाणून घ्या प्रक्रिया

12 वीच्या निकालानंतर प्रथम वर्ष प्रवेशाबाबतचा निर्णय तातडीने घेऊ : मंत्री उद्य सामंत