सहायक पोलिस निरीक्षकासह चार पोलीस जखमी

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

दूध बंद आंदोलन सुरू असल्याने गस्तीवर असताना महामार्गावर सुसखिंड येथे अपघात झालेल्या तरुणाला मदत करायला थांबलेल्या पोलिसांच्या गाडीला धडकून अपघात झाला. यामध्ये सहायक पोलिस निरीक्षकासह चार पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. हा अपघात गुरुवारी पहाटे झाला आहे.
[amazon_link asins=’B06XHM2MJ3′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7c8ef8c4-8b4c-11e8-94eb-2f2df855d16e’]
हिंजवडी पोलीस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक पगारे, हवालदार एम.पी. पशाले, शिंदे आणि पाटील हे जखमी झाले आहेत. या प्रकरणी पशाले यांनी फिर्याद दिली आहे तर एका कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूध बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे बावधन चौकीचे पोलीस अधिकारी व कर्मचारी पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर गस्त घालत होते. दरम्यान सुसखिंड येथे रस्त्याच्या बाजूला दोन तरुण जखमी अवस्थेत पडल्याचे दिसले. पोलिसांनी गाडी उभा करून त्यांना मदत कार्य सुरू केले. त्यावेळी वेगात आलेल्या एका कार चालकाने पोलिसांच्या कारला धडक दिली.

यामुळे सहायक निरीक्षक आणि पोलीस कर्मचारी जखमी झाले. तत्काळ त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर कार चालक फरार झाला आहे. तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.