अपहरण केलेल्या ४ पोलिसांपैकी तिघांची दहशतवाद्यांकडून हत्या

श्रीनगर : वृत्तसंस्था 

शोपियान जिल्ह्यातून काल अपहरण केलेल्या ४ विशेष पोलीस अधिकाऱ्यांपैकी तिघांची दहशतवाद्यांनी हत्या केल्याचे आज सकाळी उघड झाले. एकाची सुटका केली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e354f65c-bd66-11e8-8bcb-31e33312f992′]

पोलीस व निमलष्करी दलाच्या जवानांनी घेतलेल्या शोध मोहिमेत तिघांचे मृतदेह आढळून आले आहेत. कुलदीप आणि फिरदौज या विशेष पोलीस अधिकारी व निसार या पोलीस कर्मचाऱ्यांचा मृतदेह सापडला आहे.

पोलीस दलाने काम करु नये, म्हणून गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांकडून पोलिसांना वारंवार टार्गेट केले जाते. या पार्श्वभूमीवर, गुरुवारी रात्रीपासून शोपियान जिल्ह्यातून चार पोलीस कर्मचारी बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती. संशयित दहशतवाद्यांनी या चार पोलिसांचं अपहरण केल्याची माहिती समोर आली होती. मात्र, या अपहरणामागे कोणत्या दहशतवादी संघटनेचा हात आहे, हे अद्यापपर्यंत स्पष्ट झालेले नाही. तीन विशेष पोलीस अधिकारी आणि एका पोलीस कर्मचाऱ्यांचे अपहरण करण्यात आले आहे. राजीनामा देऊन ड्युटीवर जाऊ नका अन्यथा परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांकडून या पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात आली होती.

पेट्रोल डिझेल नंतर आता सीएनजीचा भडका

काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी काश्मीर पोलीस दलातील ६ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचे अपहरण केले होते. दहशतवाद्यांनी दक्षिण काश्मीरमधील पोलिसांच्या घरात घुसून कुटुंबीयांचे अपहरण केले. गेल्या काही दिवसांत सुरक्षा दलांनी परिसरात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम हाती घेऊन काही दहशतवाद्यांना अटक केली होती. या पार्श्वभूमीवर हे अपहरण म्हणजे पोलीस खात्यावर दबाव आणण्यासाठी दहशतवाद्यांनी केलेली खेळी असल्याची माहिती पोलीस खात्यातील सूत्रांनी दिली होती.

यापूर्वी त्राल परिसरात एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचे अपहरण करण्यात आले होते. या मुलाच्या कुटुंबीयांनी दयाभावना दाखवून दहशतवाद्यांनी आपल्या मुलाची मुक्तता करावी, अशी विनंती केली होती. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलदेखील झाला होता.

[amazon_link asins=’B0756Z43QS,B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6c44f5ef-bd67-11e8-87f9-c348c12bb631′]