ठाण्याच्या कोलशेत खाडीत 4 संशयित आढळल्याने खळबळ 

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – ठाण्यातील कोलशेत येथील खाडी किनारी गुरुवारी रात्री चार संशयित इसम आढळल्याने खळबळ उडाली आहे. इथूनच स्फोटकांसाठी वापरले जाऊ शकणारे अमोनिया नायट्रेट एका बाटलीत द्रव्य स्वरूपात आढळले. पोलिसांसह नौदलानेही खाडी परिसरात शोध मोहीम सुरु केली आहे.

कोलशेत येथील खाडी किनारी याच भागातील एक रहिवासी गेला असता रात्री सव्वा दहा वाजताच्या सुमारास त्याला ४ संशयित इसम दिसले. चौघांचीही शरीरयष्टी धिप्पाड होती. त्यांच्या पाठीवर बॅगाही होत्या. कोलशेत भागातच एअर फोर्स स्टेशन आहे. या जागरूक रहिवाशाने तातडीने एअर फोर्सच्या अधिकाऱ्यांना आपला संशय बोलून दाखविला. एअर फोर्सने पोलिसांसह नौदलाला ही माहिती लगेच दिली. त्यानंतर संशयित इसमाची शोध मोहीम वेगात सुरु करण्यात आली.

ही शोध मोहीम सुरु असताना रात्री उशिरा कोलशेत खाडी परिसरात अमोनियाची पावडर एका पिशवीत कापुरबावडी पोलिसांना  मिळाली. स्फोटके तयार करण्यासाठी अमोनिया नायट्रेटचा वापर केला जातो. ही पावडर टाकणारे कोण होते, याचा शोध घेण्यात येत आहे. घातपाताच्या संशयाने पोलिसांनी या संपूर्ण भागाची तपासणी सुरु केली आहे.

खाडीच्या पलीकडे भिवंडीचा भाग सुरु होतो आणि एकीकडे वर्सोवा परिसर आहे. या भागातही पोलिसांनी शोध मोहीम सुरु केली आहे. संपूर्ण खाडी परिसरात पोलीस, जलद कृती दल, एअर फोर्स आणि नौदलाने बंदोबस्त लावला आहे.

ह्याही बातम्या वाचा-

धक्कादायक ! वीट कामगाराला खायला लावली ‘विष्ठा’ 

कोंढव्यातील प्लॉस्टिकच्या गोडावूनला भीषण आग ; गोडावूनसह १ रिक्षा, १ स्कुलव्हॅन भस्मसात 

‘त्या’ प्रकरणी महापालिका, रेल्वे विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

मशिदीमध्ये गोळीबार ; ६ जणांचा मृत्यु  

Loading...
You might also like