बंदोबस्तात अडकलेले ४ हजार ८९६ पोलीस बजावणार मतदानाचा हक्क 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –  बंदोबस्त, निवडणूकीची धावपळ त्यासोबतच पोस्टल मतदानाचा फॉर्म भरून तो केंद्रावर नेऊन देणे, यासाठी अपुरा वेळ यामुळे हजारो पोलीस कर्मचारी मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित राहात होते. परंतु यंदा सुरुवातीपासूनच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे पुण्यात बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या ४ हजार ८९६ पोलीसांना पोस्टल मतदान करता येणार आहे.

पोस्टल मतदानासाठी पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास भोसले यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केली. पोस्टल मतदानासंदर्भातील सर्व सर्व जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. त्यानंतर पोलीस आयुक्तालयात सर्व पोलीस ठाण्याचे प्रशासन अधिकाऱ्यांना पोस्टल मतदानावर उपजिल्हाधिकारी सुनिल गाढे यांनी प्रशिक्षण दिले. त्यानंतर सर्व पोलीस ठाण्यातील पोलिसांचे मतदार यादीतील क्रमांक घेऊन फॉर्म १२ मागवून  पुणे शहर पोलीस दलातील २ हजार ६९१ तर  बाहेरुन आलेल्या २ हजार २०५ पोलीस कर्मचाऱ्यांनी मतदानासाठी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण केली. मागील काही निवडणुकांमध्ये मतदान करु न शकलेल्या पण यंदा मतदान करण्याची इच्छा असलेल्या १ हजार ७५१ पोलिसांची