देशात प्रथमच ‘कोरोना’चं नवं रूप आलं समोर, 4 वेळा टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर सुद्धा शरीरात सापडली ‘अँटीबॉडी’

नवी दिल्ली : देशात प्रथमच कोरोना व्हायरसचे एक नवे रूप समोर आले आहे. देशातील सर्वात मोठी अखिल भारतीय वैद्यकीय संस्था (एम्स) दिल्लीमध्ये दाखल एका रूग्णाचा चारवेळा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर सुद्धा त्याच्या शरीरात कोरेाना व्हायरसच्या विरूद्ध अँटीबॉडी सापडली आहे. ही अँटीबॉडी एखाद्या व्यक्तीच्या शरीरात तेव्हाच बनू शकते, जेव्हा त्यास कोरोनाचा संसर्ग झालेला असतो. अँटीबॉडी तयार होण्यासाठी सुमारे पाच ते सात दिवसांचा कालावधी लागतो. ही अँटीबॉडी रूग्णाच्या शरीरातील संसर्गाशी लढण्याचे काम करते.

दिल्ली एम्सच्या जीरिएटिक विभागात एक महिला रूग्ण अनेक दिवसांपासून दाखल होती. 80 वर्षांच्या ज्येष्ठ महिलेला डायबिटीज, हायपरटेंशनशिवाय 15 दिवसांपासून कमजोरीची समस्या होती. महिलेच्या शरीरात टीएलसीची संख्या कमी होत होती.

डॉक्टरांनी संसर्ग संशयास्पद वाटल्याने 12 दिवसात चारवेळा आरटी-पीसीआरद्वारे कोरोना व्हायरसची तपासणी केली, परंतु हैराण कराणारी बाब ही आहे कही, एकाही तपासणीत संसर्गाला दुजोरा मिळाला नाही. या सर्व तपासण्या दिल्ली एम्सच्या अत्याधुनिक सुविधायुक्त प्रयोगशाळेत करण्यात आल्या होत्या.

प्रत्येकवेळी रिपोर्ट निगेटिव्ह येणे आणि रूग्णात एकसारखी लक्षणे कायम असल्याने एकवेळ अशी आली की डॉक्टरसुद्धा चक्रावले. मात्र, यानंतर डॉक्टरांनी रूग्णाला संक्रमित समजूनच उपचार केले आणि पाचव्यावेळी अँटीबॉडीची टेस्ट केली.

या तपासणीत रूग्णाच्या शरीरात अँटीबॉडी आढळली. नुकतेच युकेच्या शास्त्रज्ञांनी ज्या डेक्सामेथासोन औषधाला कोविडवर उपयुक्त असल्याचे सांगितले होते, त्यास भारतात परवानगी मिळाल्यानंतर महिला रूग्णाला एम्सच्या डॉक्टरांनी 10 दिवसांपर्यंत दिले होते.

आरटी-पीसीआर तपासणीला सुद्धा हुलकावणी देतोय व्हायरस

एम्सच्या डॉ. विजय गुर्जर यांनी सांगितले की, कोरोना व्हायरसबाबत आजपर्यंत वेगवेगळे सिद्धांत समोर आले आहेत, परंतु यामध्ये एक बाब स्पष्ट झाली आहे की, जर एखाद्या रूग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह आहे तर त्याचा अर्थ असा नाही की तो पॉझिटिव्ह नाही. 25 जूनपासून 7 जुलैच्या दरम्यान चारवेळा एम्समध्ये आरटी-पीसीआर तपासणी केली गेली होती, ज्यामध्ये प्रत्येकवेळी रिपोर्ट निगेटिव्ह आढळला. आरटी-पीसीआर तपासणी कोरोना व्हायरसचा शोध घेणारी सर्वात चांगली तपासणी आहे. परंतु, रूग्णात संसर्ग न आढळल्याने डॉक्टरांनी त्यास पॉझिटिव्ह समजून उपचार केले. यादरम्यान शरीरात अँटीबॉडी मिळाल्याने हे स्पष्ट झाले की, लक्षणांच्या आधारावर संशयित रूग्ण कोरोना संक्रमित होता.

लक्षणं न आढळल्याने डिस्चार्ज
डॉ. गुर्जर यांनी सांगितले की, रूग्णाचा 7 जुलैचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने आणि स्थिती पहिल्यापेक्षा चांगली झाल्याने तसेच लक्षणे न आढळल्याने त्यास डिस्चार्ज देण्यात आला आहे. तो पूर्वीपेक्षा बरा आहे. अशाच प्रकारे अनेक लोकांमध्ये पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर सुद्धा ते निगेटिव्ह असतात. त्यांच्यावर व्हायरसचा कोणताही परिणाम दिसत नाही.

डॉ. विजय गुर्जर यांचे म्हणणे आहे की, आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांचासुद्धा राजीव गांधी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये निगेटिव्ह रिपोर्ट आला होता. दुसर्‍या दिवशी ते पॉझिटिव्ह आढळले. तर दिल्ली पोलीसच्या शैली बन्सल यांचे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्यात कोरोनाची लक्षणे होती, पण रिपोर्ट निगेटिव्ह होता.

असेच एक प्रकरण रोहतक येथील निवासी डॉक्टरचे आहे, ज्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यामध्ये व्हायरसची लक्षणे असूनही रिपोर्ट निगेटिव्ह आला, परंतु या लोकांना कोरोना योद्धा सन्मान मिळाला नाही. परंतु, सत्य हे आहे की, रिपोर्टच्या आधारावर कोरोना संक्रमित आहे किंवा नाही हे ठरवले जाऊ शकत नाही, यासाठी सरकारने मार्गदर्शक तत्वांमधये बदल करणची गरज आहे आणि त्यांना सन्मान देण्याची गरज आहे.