कानपूर रेल्वे स्टेशनवर रुळावरून डब्बे घसरले, सर्वत्र गोंधळ

कानपूर : वृत्तसंस्था – कानपूर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर येत असताना व प्रवासी उतरण्याच्या तयारीत असताना लोकलचे डब्बे घसरले. या प्रकारामुळे एकच गोंधळ उडाला. मात्र, लोकलचा वेग अत्यंत कमी असल्याने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही.

बुधवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास लखनौ ते कानपूर ही मेमू लोकल कानपूर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर ३ वर येत होती. प्लॅटफॉर्मवर गाडी येत असल्याने नोकरदार वर्ग उतरण्याच्या तयारीत दरवाजात उभे होते. गाडीचा वेग कमी झाला होता. अचानक लोकलचे चार डब्बे रुळावरुन घसरले. त्यामुळे प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. अनेक जण घाबरुन गेले. रेल्वे प्लॅटफॉर्मवरही लोकांची गर्दी होती. त्यांना आपल्या डोळ्यासमोर लोकल रुळावरुन घसरुन कडेच्या खांबांना जाऊन धडकताना पहायला मिळाली. सुदैवाने लोकलचा वेग कमी असल्याने कोणीही जखमी झाले नाही.

अपघातानंतर प्लॅटफॉर्म ३ वरील वाहतूक थांबविण्यात आली असून दुर्घटनाग्रस्त डब्बे बाजूला करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like