पुण्यात ‘त्या’ प्रेमीयुगलाचे कव्हर घातलेल्या कारमध्ये ‘अश्‍लील’ चाळे, आजीबाईंनी केला ‘पर्दाफाश’

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – अनेक वेळा प्रेमीयुगल गाडीमध्ये अश्लील चाळे करताना आढळून येतात. पोलिसांनी अशा प्रकारच्या अनेक युगलांना पकडल्याच्या घटना आपण ऐकत असतो. मात्र पुण्यातील कोथरूडमध्ये अशाच प्रकारची विचित्र घटना घडली आहे. मात्र यावेळी पोलिसांनी नाही तर चक्क एका आजीबाईनी या प्रेमीयुगलाला रंगेहाथ पकडले आहे.

कोथरूडमधील परमहंसनगरमध्ये एका कव्हर घातलेल्या कारमधून एसीचा आवाज येत असल्याने एका आजीबाईंनी या गाडीत लहान मुले अडकल्याची भीतीने सोसायटीतील सदस्यांना बोलावून या गाडीचे कव्हर काढले असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या आजीबाई खाली रस्त्यावर आल्या असता त्यांना गाडीवर कव्हर असल्याचे आढळून आले मात्र गाडीतून एसीचा आवाज येत होता. घरी टीव्हीवर गाडीत लहान मुले गुदमरून मृत्यू झाल्याच्या घटना बघितल्या होत्या. त्यामुळे घाबरलेल्या आजीबाईंनी सर्व नागरिकांना गोळा करून या गाडीचे कव्हर काढले. त्यानंतर आतमधील दृश्य पाहून सर्व नागरिक हैराण झाले. या गाडीत हे प्रेमीयुगल अश्‍लील चाळे करत होते. त्यानंतर नागरिकांनी त्यांना समज देत तेथून हाकलून लावले.

दरम्यान, या भागात मोठ्या प्रमाणावर गाड्यांतील वस्तू चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर येथील रस्ता मोठा असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणावर गाड्या पार्क करत असतात. त्यामुळे या अवैधरित्या पार्क केल्या जाणाऱ्या गाडयांना कशा प्रकारे रोखावे असा प्रश्न या सोसायटीला नागरिकांना पडला आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी विशिष्ट भूमिका घेऊन कारवाई करावी अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

Loading...
You might also like