सिंगल चार्जमध्ये 500 KM रेंज देणार Pravaig Extinction MK1 इलेक्ट्रिक कार ! Tesla ला देणार ‘टक्कर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात Pravaig Extinction MK1 या इलेक्ट्रिक कारची जोरदार चर्चा सुरू आहे. कारण ही कार टेस्ला कारला टक्कर देणारी आहे. जबरदस्त रेंजच्या दृष्टीने ही कार डिझाइन केली गेली आहे आणि दाव्यानुसार ती सिंगल चार्जमध्ये शेकडो किलोमीटर अंतर जाण्यास सक्षम आहे. ही कार बेंगळुरू आधारित कंपनी Pravaig Extinction ने तयार केली आहे. आशा आहे की यावर्षी ही कार भारतात लॉन्च होईल.

मिळालेल्या माहितीनुसार ,Pravaig Extinction MK 1 सिंगल चार्जमध्ये 500 किमी अंतर कापू शकेल. इतर प्रीमियम इलेक्ट्रिक कारशी तुलना केल्यास फोक्सवॅगन ID.3 मुश्किलीने 500 किलोमीटर रेंज देऊ शकेल. टेस्ला मॉडेल 3 चे शोकेस वर्जन सिंगल चार्जमध्ये 507 किलोमीटर रेंंजचा दावा करते. दुसरीकडे, जर आपण भारतात हाय- रेंज इलेक्ट्रिक कारबद्दल चर्चा केली तर ह्युंदाई कोना ईव्ही 452 किमी रेंज, एमजी झेडएस ईव्ही 340 किमी रेंज आणि मर्सिडीज ईक्यूसी फक्त 350 किमी रेंज ऑफर करतात.

माहितीनुसार, Extinction MK1 ला 80% चार्ज करण्यास फक्त 30 मिनिटे लागतात. या कारमध्ये 96 किलोवॅट क्षमतेची बॅटरी आहे जी 200 एचपीची जास्तीत जास्त गती आणि 196 किमी प्रतितास जास्तीत जास्त वेग निर्माण करण्यास सक्षम आहे. शून्य ते 100 kmph वेगापर्यंत पोहोचण्यासाठी या कारला 5.4 सेकंद लागतील.

या कारला 10x सीओ 2 ची कपात आणि एक शक्तिशाली PM2.5 फिल्टर देण्यात येईल, ज्यामुळे कारची एयर क्वालिटी हिमालयीन हवेसारखी होईल. गाडीमध्ये 15 इंचाचा लॅपटॉप ठेवण्यासाठी एक डेस्क, पॉवर पोर्ट आणि 2 यूएसबी थंडरबोल्ट पोर्ट देण्यात येतील. एवढेच नाही तर Pravaig इलेक्ट्रिक कार टाकीप्रमाणे तयार केली जात आहे.