डॉक्टरांनी नाही केला ‘उपचार’, तडफडून ‘मरण’ पावला ‘निष्पाप’ जीव, छातीशी लाडक्याचा मृतदेह कवटाळून रडत राहिले वडील

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : उत्तर प्रदेशच्या कन्नौज जिल्ह्यात डॉक्टरांची असंवेदनशीलता एका निष्पाप जीवावर भारी पडली. तापाने त्रस्त झालेल्या मुलाचा मृत्यू झाला, पण त्याला उपचार न मिळाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला. विनंतीवरून उपचार सुरु केले पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. अर्ध्या तासात मुलाचा मृत्यू झाला. रडत विव्हळत असणारा वडील लाडक्याचे शरीर छातीशी धरून ओरडत राहिला की जर डॉक्टरांनी त्याच्यावर वेळेवर उपचार केले असते तर कदाचित मुलगा जिवंत राहिला असता.

सदर ब्लॉकमधील मिश्रीपूर गावात राहणारे प्रेमचंद यांचा चार वर्षांचा मुलगा अनुज हा अनेक दिवसांपासून तापाने तडफडत होता. रविवारी संध्याकाळी प्रेमचंद आपल्या मुलाला घेऊन जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. त्यांचा असा आरोप आहे की डॉक्टरांनी त्याच्यावर उपचारांऐवजी कानपूरला नेण्यासाठी दबाव आणण्यास सुरूवात केली, तथापि मुलाची प्रकृती इतकी स्वस्थ नव्हती की त्याला इतक्या लांब नेले जाऊ शकेल.

बर्‍याच विनवण्यांनंतर अनुजला इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आणि उपचार सुरू झाले. अचानक त्याची तब्येत ढासळली आणि पाहता पाहता त्याचा मृत्यू झाला. अनुज मृत असल्याचे डॉक्टरांनी सांगताच प्रेमचंद खवळले. जमिनीवर डोके ठेऊन रडू लागले. मुलाचा मृतदेह छातीशी धरून वॉर्डबाहेर आले आणि जोरजोरात ओरडू लागले. त्यांना रडताना पाहून सर्वांचे डोळे भरून आले.

मुलाला गंभीर अवस्थेत रुग्णालयात आणले गेले होते. उपचार सुरू करून त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला गेला. बालरोग तज्ञ डॉ. पीएम यादव यांनी उपचार सुरू केला होता. दरम्यान त्यांनी घरातील सदस्यांना अनुजला कानपूरला नेण्याचा सल्ला देखील दिला. तथापि मुलाची स्थिती अशी नव्हती की त्याला रेफर करून काही फायदा झाला असता, त्याकडे दुर्लक्ष करणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. असे सीएमओ कन्नौज, डॉ. कृष्ण स्वरूप यांनी सांगितले.