मार्केट यार्डात पुन्हा अपघात, ट्रकच्या धडकेने चौदा वर्षांच्या मुलाचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मार्केट यार्ड परिसरात पुन्हा दुसरा अपघात झाला असून भरधाव ट्रकने दिलेल्या घडकेत धडकेने चौदा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. बुधवारी दुपारी ही अपघात मार्केटयार्डच्या गेट क्र. चारवर झाला. या प्रकरणी ट्रक चालकाला पोलिसांनी अटक केली.

विष्णू केतन वाघिले (वय १४,रा. आंबेडकरनगर, मार्केटयार्ड) असे मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी ट्रक चालक रमेशचंद्र सखाराम डालके (वय ३८,रा. धरममुरी, जि. धार. मध्यप्रदेश) याला अटक करण्यात आली आहे. पोलीस नाईक चंद्रकांत केंद्रे यांनी यासंदर्भात मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मार्केटयार्डच्या प्रवेशद्वार क्रमांक चार जवळ बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास वाघिले हा मुलगा तेथून जात होता. त्यावेळी ट्रकने त्याला जोरदार धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या वाघिलेचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला झाला. सहाय्यक पोलीस निरीक्षक खटके तपास करत आहेत.