Foreign Portfolio Investors | गुंतवणुकदारांचा भारतावर वाढवला विश्वास, जूनमध्ये आतापर्यंत FPI ने केली 12,714 कोटी रुपयांची गुंतवणूक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था परदेशी पोर्टफोलियो गुंतवणुकदार म्हणजे एफपीआय (Foreign Portfolio Investors) ने जूनमध्ये भारतीय बाजारात (Indian market) 12,714 कोटी रुपये टाकले आहेत. यापूर्वीच्या दोन महिन्यांच्या दरम्यान ते निव्वळ विक्री करत होते. यापूर्वी, मे मध्ये एफपीआयने भारतीय बाजारांतून 2,666 कोटी रुपये आणि एप्रिलमध्ये 9,435 कोटी रुपये काढले होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

डिपॉझिटरी सेवा कंपन्यांच्या आकड्यांनुसार, 1 ते 25 जूनच्या दरम्यान एफपीआयने शेयरमध्ये (FPI shares) 15,282 कोटी रुपये टाकले.
या दरम्यान त्यांनी कर्ज किंवा बाँड बाजारातून 2,568 कोटी रुपये काढले.
अशाप्रकारे त्यांची निव्वळ गुंतवणूक 12,714 कोटी रुपये राहिली.

बजाज कॅपिटलचे जॉईंट चेयरमन आणि एमडी संजीव बजाज (MD Sanjeev Bajaj) यांनी म्हटले की, जूनमध्ये भारतीय बाजारात प्रवाह, अनुकूल जागतिक संकेत तसेच भारतीय अर्थव्यवस्थेच्या (Indian economy) स्थितीत सुधारणांमुळे वाढला आहे.
कोविड-19 च्या प्रकरणात घट झाल्याने प्रतिबंध शिथिल केले आहेत.
तसेच लसीकरणाचा वेग सुद्धा वाढला आहे.

कोटक सिक्युरिटीजचे एग्झीक्यूटिव्ह व्हाईस प्रेसिडंट (इक्विटी टेक्निकल रिसर्च) श्रीकांत चौहान यांनी म्हटले, एकुण मिळून या आठवड्यात एमएससीआय इमर्जिंग मार्केट इंडेक्स सुमारे 1.49 टक्के वाढला आहे.
या महिन्यात आजच्या तारखेपर्यंत भारत आणि इंडोनेशिया वगळता इतर वाढणार्‍या तसेच आशियाई बाजारातून एफपीआयने पैसे काढले आहेत.

एप्रिलमध्ये 134 टक्के वाढ

अर्थव्यवस्थेच्या बाबतीत केंद्र सरकारसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे.
यावर्षी एप्रिलमध्ये आयआयपी म्हणजे औद्योगिक उत्पादन निर्देशांकाची (Index of Industrial Production) ग्रोथ 134 टक्के होती.

Web Title : fpi foreign portfolio investors turn net buyers in june invest rs 12714 crore in indian markets

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Corona Vaccination | लसीकरणात भारताने अमेरिकेला टाकले मागे; 32 कोटी 36 लाख नागरिकांचे लसीकरण