आता याला काय म्हणावं? दुकानं बंद आहेत म्हणून थेट पंतप्रधान कार्यालयातच पाठवली शेकडो अंतर्वस्त्र

पॅरिस : वृत्त संस्था – भारत, अमेरिका, फ्रान्ससारख्या इतर अनेक देशांमध्ये कोरोनाचे मोठे संकट आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर फ्रान्समध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे. या सर्व परिस्थितीनंतर फ्रान्सच्या पंतप्रधान कार्यालयात पोस्टाच्या माध्यमातून शेकडो अंतर्वस्त्रे पाठवली आहे. त्यामुळे पंतप्रधान कार्यालय चांगलेच वैतागले आहे.

पंतप्रधान जीन कॅस्टेक्स यांच्या कार्यालयात हा प्रकार घडला आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. तसेच तेथे लॉकडाऊनही आहे. या अशा परिस्थितीतच पंतप्रधान कार्यालयात अंतर्वस्त्रे पाठवण्यात आली आहेत. याची माहिती घेतल्यानंतर ही अंतर्वस्त्रे ‘पार्सलं लाँजरी’ या अंतर्वस्त्रे दुकानाच्या मालकाने पाठवल्याचे स्पष्ट झाले आहे. लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवहार बंद आहेत. त्यामध्ये शेकडो अंतर्वस्त्रांची दुकानेही बंद आहेत. त्यामुळे आर्थिक नुकसानही होत असल्याने ही अंतर्वस्त्रे पाठवत दुकाने पुन्हा उघडण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती करणारी पत्रेही पाठवण्यात आली आहेत.

दरम्यान, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही जास्त आहे. त्यामुळे ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी अनेक निर्बंध लावण्यात आली आहेत. त्यामध्ये लॉकडाऊनसारखे निर्णय घेण्यात आले आहेत.

पॅरिस जगभरातील फॅशनचे केंद्र

फ्रान्सची राजधानी पॅरिस हे ठिकाण जगभरातील फॅशनचे केंद्र मानले जाते. जगभरातील नामांकित अनेक फॅशन ब्रँड पॅरिसमधून त्यांच्या सगळा व्यवहार करत असतात. मात्र, देशात लॉकडाऊन असल्याने सर्वच व्यवहार बंद आहेत.