फ्रान्स सरकारचा मोठा निर्णय ! विदेशी मुस्लिम इमामांच्या देशातील ‘एन्ट्री’वर घातली ‘बंदी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर्मनीत मुस्लिमांविरोधात निषेध केला जात आहे. या दरम्यान फ्रान्सनेही आपल्या देशात परदेशी इमामांना न येण्याचा आदेश दिला आहे. फ्रान्सच्या सरकारने हा निर्णय यासाठी घेतला आहे, कारण देशातील दहशतवादी कारवाया थांबवल्या जाव्यात. राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनीही या निर्णयाला मान्यता दिली आहे.

राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की २०२० नंतर आम्ही आपल्या देशात इतर कोणत्याही देशातून येणाऱ्या मुस्लिम इमामांवर बंदी घातली आहे. फ्रान्समध्ये दरवर्षी सुमारे ३०० इमाम जगभरातून येत असतात.

राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी सांगितले की, हे पाऊल उचलल्याने फ्रान्समधील दहशतवादी कारवाया थांबतील. फ्रान्समध्ये जास्त करून इमाम हे अल्जेरिया, मोरोक्को आणि तुर्की येथून येतात. ते येथे येऊन मदरशांमध्ये शिकवतात. आम्ही फ्रेंच मुस्लिम कौन्सिलला (CFCM) सांगितले आहे की त्यांनी यावर लक्ष ठेवावे की २०२० नंतर कोणतेही परदेशी मुस्लिम इमाम फ्रान्समध्ये येणार नाहीत.

राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी सीएफसीएम (CFCM) ला हे देखील सांगितले आहे की फ्रान्समधील सर्व परदेशी इमामांना फ्रेंच शिकण्यास सांगावे आणि कट्टरपंथीय भावना भडकवू नयेत. कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी कार्यात सहभागी होऊ नये. तसेच फ्रान्स कायद्याचे संरक्षण करावे.

इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणाले की, सर्व दहशतवादी हे मुस्लिमच असतात असे नाही. परंतु बर्‍याच बाबतीत इस्लामिक दहशतवाद चव्हाट्यावर आला आहे. म्हणूनच आम्ही असे पाऊल उचलले आहे. फ्रान्सचे रक्षण करण्याचे मी सर्व धर्मातील लोकांना आवाहन करीत आहे. या देशाच्या कायद्याचे पालन सगळ्यांनी करा.

राष्ट्रपती म्हणाले की फ्रान्सची संस्कृती आणि परंपरा शिकण्याचा प्रयत्न करा. यामुळे त्यांचे ज्ञान आणि अनुभव वाढेल. तसेच यावर्षी सप्टेंबर नंतर फ्रान्समध्ये परदेशी मुस्लिम इमामांना देशात प्रवेश करण्यास बंदी घातली जाईल.

तसेच ते म्हणाले की धर्माच्या नावाखाली लोक मशिदींकडे पैसे कसे पाठवतात. या पैशांचा चुकीच्या गोष्टींसाठी वापर केला जातो. फ्रान्स मुस्लिमांच्या विरोधात नाही परंतु दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्यांच्या बाजूनेही नाही. म्हणून जे असे करतात त्यांना आम्ही सोडणार नाही.

राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणाले की आपल्या देशात ९ मुस्लिम देशांमधील इमाम येऊन शिकवतात. परंतु आता माझे सरकार पुष्टी करेल की भविष्यात या ९ देशांमधून कोणताही इमाम येऊ नये.

या आदेशानंतर काही लोक राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉनला विरोध करत आहेत. दक्षिणपंथी पक्षाच्या नेत्या मरीन ले – पेन यांनी मॅक्रॉनवर फ्रान्समधील मुस्लिमांसाठी योग्य निर्णय घेत नसल्याचा आरोप केला आहे. फ्रान्समधील मुस्लिमांची एकता कायम ठेवणे महत्त्वाचे आहे.

You might also like