चीननंतर फ्रान्समध्ये ‘नवा’ व्हायरस, ‘कोरोना’नंतर आता ‘टोमॅटो’ व्हायरसची ‘दहशत’

पॅरिस : वृत्तसंस्था – जगभरामध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले असून या व्हायरसमुळे एकट्या चीनमध्ये दीड हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची दहशत वाढत असतानाच आता फ्रान्समध्ये एका नव्या व्हायरसने डोकं वर काढलं आहे. फ्रान्समधील हा व्हायरचा परिणाम माणसांवर नाही तर टोमॅटोवर झाला आहे. फ्रान्समधील टोमॅटोच्या शेतीवर व्हायरसने हल्ला केल्यानं संपूर्ण शेती नष्ट होण्याची शक्यता आहे.

फ्रान्सच्या कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, फिनिस्टरमध्ये टोमॅटोच्या झाडांवर एक घातक विषाणू संक्रमित झाला आहे. यामुळे पूर्ण शेती उद्धवस्त होण्याची शक्यता आहे. या घातक विषाणूच्या संक्रमणावर कोणताही उपचार नाही, त्यामुळे टोमॅटोच्या शेतीला पूर्णपणे वेगळं करण्यात आले आहे. तसेच ग्रीनहाऊसही नष्ट केले जाणार असल्याचे कृषी मंत्रालयाने सांगितले.

या विषाणूची लागण झालेले टोमॅटो खाण्यालायक रहात नाही आणि त्यांच्यावर डाग पडतात. या विषाणूचा माणसांवर कोणताही दुष्परिणाम होत नाही. मात्र टोमॅटोच्या झाडांना विष्णूची लागण झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. फ्रान्सप्रमाणे इटली आणि स्पेनमध्येही टोमॅटोच्या झाडांना या व्हयरसची लागण झाली आहे. युरोपियन युनियनमध्ये स्पेन आणि इटली सर्वाधिक टोमॅटोचे उत्पादन करणारे देश आहेत. मात्र या विषाणूमुळे टोमॅटोच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून टोमॅटोची शेती नष्ट करण्यात येत आहे.

You might also like