खुशखबर ! ‘फ्रॅन्कलिन टेम्पलटन’ लवकरच गुंतवणूकदारांचे पैसे करणार परत

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   फ्रँकलिन टेम्पलटन म्युच्युअल फंडने सोमवारी म्हटले की, ते गुंतवणूकदारांचे पैसे लवकरात लवकर परत करण्यासाठी वचनबद्ध आहेत. कंपनीने अलीकडेच रकमेच्या संकटामुळे आपली सहा बॉण्ड योजना बंद केली होती.

कंपनीच्या अध्यक्षांनी गुंतवणूकदारांना पाठवला संदेश

कंपनीने म्हटले की योजना बंद करण्याचा अर्थ गुंतवणूकदारांचे पैसे बुडवणे असा नाही. फ्रँकलिन टेम्पलटन ऍसेट मॅनेजमेन्ट (इंडिया) चे अध्यक्ष संजय सप्रे यांनी गुंतवणूकदारांना पाठवलेल्या संदेशात म्हटले की, ज्या योजना बंद केल्या आहेत, त्या गुंतवणूकदारांना लवकरात लवकर पैसे परत करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत. सोबतच हा आमच्या ब्रँडमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा आत्मविश्वास पुनर्संचयित करण्याचा देखील प्रयत्न आहे.’

बंद झाल्या या योजना

फ्रँकलिन इंडिया लो ड्यूरेशन फंड
फ्रँकलिन इंडिया डायनॅमिक ऍक्युरल फंड
फ्रँकलिन इंडिया क्रेडिट रिस्क फंड
फ्रँकलिन इंडिया शॉर्ट टर्म इन्कम प्लॅन
फ्रँकलिन इंडिया अल्ट्रा शॉर्ट बॉन्ड फंड
फ्रँकलिन इंडिया इन्कम अपॉर्च्युनिटीज फंड

यामुळे बंद केल्या योजना

या सहा योजनांमध्ये गुंतवणूकदार २५,००० कोटींपेक्षा जास्त रकमेवर अडकले आहेत. कंपनीने बाँड मार्केटमध्ये रोख रकमेचा अभाव असल्याचे सांगत या योजनांना स्वतःहूनच बंद करण्यासाठी पुढाकार घेतला होता. ते म्हणाले की, ग्राहकांच्या हिताचा विचार करत हा निर्णय घेण्यात आला आहे.

भारतासाठी वचनबद्ध आहे कंपनी

सप्रे म्हणाले, ‘फ्रॅंकलिन टेम्पलटनने भारतात फार पूर्वी काम सुरू केले होते. कंपनीने येथे २५ वर्षांहून अधिक काळ दीर्घकालीन व्यवसाय उभा केला आहे. जागतिक स्तरावर काम करणाऱ्या लोकांपैकी ३३ टक्क्यांहून अधिक लोक भारतात राहतात. ते म्हणाले की, कंपनीचे जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी जेनी जॉन्सन यांनीही कंपनी भारतासाठी वचनबद्ध असल्याचे म्हटले आहे.

आरबीआयने दिला दिलासा

म्युच्युअल फंडावरील दबाव कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आज म्युच्युअल फंडासाठी ५०,००० कोटी रुपयांची विशेष लिक्विडीटी सुविधा जाहीर केली आहे. केंद्रीय बँकेने असे म्हटले आहे की, ते सावध आहेत आणि कोरोना विषाणूचा आर्थिक परिणाम कमी करण्यासाठी आणि आर्थिक स्थिरता राखण्यासाठी प्रत्येक आवश्यक पाऊल उचलतील. आरबीआय फिक्स रेपो रेटवर ९० दिवसांच्या कालावधीसाठी एक रेपो ऑपरेशन सुरू करेल.

या सुविधेअंतर्गत रिझर्व्ह बँक कमी दराने बँकांना निधी प्रदान करेल आणि विशिष्ट म्युच्युअल फंडाच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी बँका निधी वापरण्यास सक्षम असतील. आरबीआयने म्हटले आहे की, एसएलएफ-एमएफ ऑन-टॉप आणि ओपन-एण्डेड आहे आणि बँका सोमवार ते शुक्रवार या काळात कोणत्याही दिवशी वित्त मिळवण्यासाठी बोली लावू शकतात. ही सुविधा २७ एप्रिलपासून सुरू झाली आहे आणि ११ मे २०२० पर्यंत राहील.