Fraud Alert | SBI च्या ग्राहकांना सरकारनं केलं सावध, ‘हा’ SMS आला असेल तर लगेच डिलीट करा; अन्यथा…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Fraud Alert | स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank of India) खातेधारकांना एक मेसेज बाबत सरकारने सावध (Fraud Alert) केले आहे. सरकारी एजंसी पीआयबी ने (Government Agency PIB) एक एडवाइजरी जारी (Advisory Issued) केली आहे. ग्राहकांना (Customers) त्यांचे बँक अकाउंट ब्लॉक (Bank Account Block) केले जाईल, असे मेसेज येत आहेत. अशा एसएमएस (SMS) आणि कॉल्सला (Calls) उत्तर देऊ नये, असे सरकारने म्हटले आहे. तसेच एसबीआय (SBI) खातेधारकांना अशा प्रकराचे मेसेज करुन कोणतीही लिंक पाठवत नसून ग्राहकांनी मेसेजमधील लिंकला क्लिक करुन नये. असा मेसेज आला तर तो त्वरित डिलीट करावा असे सांगण्यात आले आहे.
पीआयबीने ट्विट करुन एसबीआयच्या ग्राहकांना ही माहिती दिली आहे. ट्विटमध्ये म्हटले आहे की, तुमचे एसबीआय बँक खाते ब्लॉक केले जाईल, असा मेसेज फेक (Fake Message) आहे. ट्विटमध्ये अशा बनावट मेसेजचा फोटो देखील शेअर करण्यात आला आहे.
A message in circulation claiming that your @TheOfficialSBI account has been blocked is #FAKE #PIBFactCheck
▶️ Do not respond to emails/SMS asking to share your personal or banking details.
▶️ If you receive any such message, report immediately at [email protected] pic.twitter.com/Y8sVlk95wH
— PIB Fact Check (@PIBFactCheck) May 18, 2022
सरकारने एसबीआयच्या ग्राहकांना सावध (Fraud Alert) करताना म्हटले की, खासगी (Private) अथवा बँकिंग माहिती (Banking Information) शेअर करण्यास सांगणाऱ्या ईमेल/एसएमएसला उत्तर देऊ नये. जर तुम्हाला अशा प्रकारचे मेसेज आल्यास त्वरित [email protected] वर रिपोर्ट करावा. पीआयबीने ट्विटमध्ये ग्राहकांना येणाऱ्या या बनावट मेसेजची माहिती दिली आहे. या फेक मेसेजमध्ये म्हटले आहे की, प्रिय ग्राहक, तुमचे SBI BANK डॉक्यूमेंट एक्सपायर झाले आहेत. तुमचे अकाउंट ब्लॉक होईल. अकाउंट पुन्हा सुरु करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sbikvs.ll.’ दरम्यान ही लिंक बनावट आहे. त्यामुळे कोणत्याही बनावट मेसेज अथवा लिंकला उत्तर देऊ नये. बँक खात्याची माहिती कोणाशीही शेअर करु नये. अन्यथा तुमचे बँक खाते अगदी काही सेकंदात रिकामे होईल. (Fraud Alert)
Web Title :- Fraud Alert | sbi users government wants you to delete this sms right away
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update