पतीनेच ‘भाऊ’ बनून स्वत:च्या पत्नीचं लावलं ‘लग्न’, ‘मधुचंद्रा’च्या रात्री केलं ‘असं’ काही

हरिद्वार : वृत्तसंस्था – लुटमार करण्यासाठी चोरटे कोणत्या थराला जातील याचा नेम नाही. कधी बंटी-बबली बनून एखाद्या व्यापाऱ्याला लुटतील तर कधी नवरा बायको म्हणून! मात्र, हरिद्वार येथे पोलिसांनी खऱ्या पति-पत्नीला अटक केली आहे. ही जोडी नवविवाहीत तरुणांना लुटत होती. महत्वाचे म्हणजे पती स्वत: पत्निचा भाऊ म्हणून तिचे लग्न लावून देत होता आणि आणि मधुचंद्राच्या रात्री त्याची पत्नी नवविवाहीत तरुणाचे दागिने घेऊन फरार होत होती. या दांम्पत्याला हरिद्वार पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुन्ह्याचा खरा मास्टरमाईंड पती आहे. हे दोघे बहिण-भावासारखे समोर येत होते. त्यांचे खरे नाव अंजली आणि महाविर आहे. या दोघांनी अनेकांना लुबाडले असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पती आपल्या पत्नीला बहिण असल्याचे भासवून तिचे लग्न करून देत होता. पत्नी लग्नानंतर मधुचंद्राच्या रात्री नवरदेवाचे दागिने आणि पेसै घेऊन पळून जात होती.

सहाय्यक पोलीस निरीक्षक कमलेश उपाध्याय यांनी सांगितले कि, अंजली आपले खरे नाव लपवत होती. ती पूजा म्हणून चंदीगड येथील एका तरुणाला भेटली. त्यानंतर या दोघांनी 18 डिसेंबर रोजी लग्न केले. 7 जानेवारी रोजी हे दांपत्य हरिद्वार येथे हनिमुनसाठी आले. दोघांनी एका हॉटेलमध्ये खोली घेतली होती. याच दरम्यान पूजा उर्फ अंजली संधीचा फायदा घेऊन 50 हजार रुपयांचे दागिने घेऊन पळून गेली.

पीडित तरुणाने याप्रकरणी कोतवाली पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी पूजा उर्फ अंजलीचा शोध घेऊन तिच्यासह पतीला अटक केली. या दोघांनी बहिण-भाऊ असल्याचे भासवून अनेकांना फसवले असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पोलिसांनी पूजा उर्फ अंजली विरुद्ध तक्रार दाखल झाल्यानंतर तिचा शोध घेतला. अंजली आणि महावीर या दोघांना बस स्टँडवरून अटक करण्यात आली. तपासादरम्यान महाविर याने त्याची पत्नी अंजली हिला स्वत:ची बहिण असल्याचे सांगून पीडित तरुणाशी ओळख करून दिली होती. या दोघांनी अनेकांची फसवणूक केली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून पोलीस तपास करीत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/