‘फायनान्स’ कंपनीतील कर्मचाऱ्याकडून ‘फसवणूक’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मंजूर झालेले कर्ज परत करताना फायनान्स कंपनीतील कर्मचाऱ्याने परस्पर दुसऱ्या बँक खात्यात पैसे भरायला लावून अडीच लाखांच्या रक्कमेचा अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी बापू पांडुरंग कांबळे (वय ३५, रा. तनिष्क वाटिका सोसायटी, चऱ्होली) यांनी आळंदी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी विशाल गुप्ता असे नाव सांगणाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, त्यांना बजाज फायनान्स कंपनीकडून २ लाख ६७ हजार रुपयांचे वैयक्तिक कर्ज मंजूर झाले होते.

त्याचा व्याजदर त्यांना पसंत नसल्याने ते कर्ज कांबळे यांना नको होते. त्यामुळे त्यांनी बजाज फायनान्स कंपनीच्या वाकडेवाडी येथील कार्यालयात २ लाख ४८ हजार रुपयांचा चेक दिला होता.  २५ ते ३१ मे दरम्यान त्यांना बजाज फायनान्स कंपनीच्या वेबसाईटवर असलेल्या मोबाईल व लँडलाईनवर त्यांना फोन आले. फोनवर विशाल गुप्ता नावाचा व्यक्तीने त्यांचा विश्वास संपादन करुन त्यांना तीन वेगवेगळ्या बँक खात्यात फोनवरुन पैसे भरायला सांगितले. कंपनीतूनच फोन आल्याने त्यांनी त्यावर विश्वास ठेवून त्यानुसार पैसे भरले. त्याने कंपनीत पैसे न भरता फसवणूक केल्याचे लक्षात आल्यावर कांबळे यांनी फिर्याद दिली आहे.

आरोग्यविषयक वृत्त