‘Tinder’ वरील युवकासोबतचे ‘प्रेम’ पुण्यातील महिलेला पडले महागात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – टिंडरवरून ओळख झालेल्या युवकासोबत प्रेम करणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. युवाकाने प्रेमाचे नाटक करून महिलेकडून 8 लाख 66 हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणात गुन्हे शेखेने भामट्या प्रियकराच्या मुसक्या आवळल्या आहेत. नितीन सुरेंद्र भंडारी (वय-36 रा. कोरेगाव पार्क) असे अटक करण्यात आलेल्या प्रियकराचे नाव आहे. याप्रकरणी 41 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेचे वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय असून काही दिवसांपासून महिला पतीपासून विभक्त रहात आहे. तिचा पतीसोबत घटस्फोट घेऊन तिने टिंडर या संकेतस्थळावर लग्नासाठी नोंदणी केली होती. नितीन भंडारी याने महिलेशी संपर्क साधून त्यांना भेटण्यासाठी महागड्या गाड्या घेऊन जात होता. तसेच त्याने आपले काही उद्योग असल्याचे महिलेला सांगितले. महिलेने त्याच्यावर विश्वास ठेऊन ते दोघे चार वर्षापासून एकमेकांच्या संपर्कात आले होते. दरम्याने भंडारी याने महिलेसोबत शारिरीक संबध ठेवले होते.

नितीन भंडारी याने व्यवसायात अडचणी आल्या असल्याचे सांगून महिलेकडून वेळोवेळी 8 लाख 66 हजार 400 रुपये तिच्या बँकेतून आपल्या खात्यावर ट्रान्सफर करून घेतले. महिलेने त्याच चौकशी केली असता तिला धक्का बसला. भंडारी हा बेकार असून कोणताही कामधंदा तो करत नाही. तसेच भेटण्यासाठी महागड्या गाड्या भाड्याने घेऊन येत असल्याचे समजताच तिने पैशांसाठी त्याच्याकडे तगादा लावला. त्यावेळी भंडारीने तिला मारहाण करून शांत राहण्यास सांगून धमकावले. महिलेने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर गुन्हे शाखेने मंगळवारी रात्री भंडारीला अटक केली.

आरोग्यविषयक वृत्त –

गायीच्या शुद्ध तुपाचे फक्‍त २ थेंब नाकात टाका, होतील ‘हे’ ५ आश्‍चर्यकारक फायदे !

बीटचे १० चमत्‍कारीक फायदे, जाणून घेतल्‍यानंतर आजच सुरू कराल खाणे

दिवसभरात ‘या’ वेळेला २ केळी खाल्ल्याने होतील ‘हे’ १० खास फायदे

‘या’ ७ कारणांमुळे कोणालाही होऊ शकतो ‘थायरॉइड’, तुम्हीही राहा सावध ! जाणून घ्या ‘ही’ 7 आहेत कारणे

रोज खा ५ काजू, शरीरावर होतील ‘हे’ १० सकारात्मक परिणाम, जाणून घ्या

अंडी उकडताना कधीही करु नका ‘या’ १० चुका, जाणून घ्या ‘ही’ आहे योग्य पध्दत

‘या’ ५ कारणांमुळे तुम्हालाही होऊ शकतो ‘अल्सर’, असा करा बचाव, जाणून घ्या

वयानूसार जाणून घ्‍या, दिवसभरात किती पावले चालल्‍यास रहाल तंदरूस्‍त

स्‍मरणशक्‍ती वाढेल दुपटीने, फक्‍त करा यापैकी कोणताही एक उपाय, जाणून घ्या