कोट्यावधी रुपयांचे फसवणूक प्रकरण : पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून ‘गुडविन ज्वेलर्स’च्या संचालक भावांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  अधिक परतावा देण्याचा बहाणाकरून कोट्यावधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आज “गुडविन ज्वेलर्सचे” व्यवस्थापकीय संचालक असलेल्या दोघा बंधूना अटक केली. 2019 मधील हे प्रकरण असून, त्यांना आज अटक केली आहे.

सुनीलकुमार मोहनन अक्काराकरन आणि सुधीरकुमार मोहनन अक्काराकरन (रा. चिरुर, पोष्ट थिसुर केरळ, सध्या डोंबविली) अशी अटक करण्यात आलेल्या या दोघा बंधूंची नावे आहेत. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात भादवी कलम 420 सह इतर कलमानव्ये गुन्हा दाखल आहे. याबाबत आशा गायकवाड (वय 45) यांनी तक्रार दिली आहे.

सुनीलकुमार हा गुडविलचा मॅनेजिंग डायरेक्टर आहे. तर सुधीरकुमार हा डायरेक्टर आहे. या दोघांनी गुडविल ज्वेलर्स दुकान सुरू केले होते. त्यानंतर त्यांनी अनेकांना ज्वेलर्समधील स्कीम, भिशी तसेच ठेवींमध्ये पैसे गुंतवल्यास अधिक परतावा देण्याच्या बहाण्याने विश्वास संपादन केला. परतावा देताना सोन्याचे दागिने देखील देण्यात येतील असे सांगण्यात आले आहे. गुंतवणूक दारांचे पैसे घेतले. पण त्याना परतावा दिला नाही. फिर्यादी यांनी देखील 3 लाख रुपये गुंतवणूक केली होती. याप्रकरणी तक्रार आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. नोव्हेंबर 2019 मध्ये हा गुन्हा दाखल केला होता. यानंतर या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे दिला होता. यानंतर गुंतवणूक केलेल्या अनेकांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार केली होती. यात फसवणूकीचा आकडा हा 3 कोटींपर्यंत गेला होता. दरम्यान या अक्काराकरन बंधू विरोधात ठाणे तसेच इतर ठिकाणी देखील गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी आज पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या दोघा बंधूंना अटक केली आहे. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या दोघांना 26 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ठाण्यात ‘या’ बंधुनी जवळपास 1200 गुंतवणूकदारांची 25 कोटींची फसवणूक या दोघांची केरळ, हैदराबादसह डोंबिवलीतील २६ मालमत्ता ठाणे पोलिसांनी जप्त केल्या आहेत. दरम्यान फरार झालेल्या या बंधूना ठाणे पोलिसांनी अटक केली होती. त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली. यानंतर पुणे पोलिसांनी त्यांना न्यायालयातून या गुन्ह्यात वर्ग करत अटक केली आहे.