युवतीने फसवल्याची वकिलाची फिर्याद तर युवतीचीही नामांकित वकील कुटुंबीयांविरुद्ध छळाची तक्रार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – अनेक वर्षांपासून सुरू असलेला वाद पुन्हा एकदा पोलीस ठाण्यात पोहोचला आहे. युवतीने बनावट कागदपत्र तयार करून लग्न झाल्याचे भासविले व पैशाची मागणी करून फसवणूक केल्याची फिर्याद ॲड. अभिजीत राजेश कोठारी यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यावरून सदर युवती व तिच्या कुटूंबियांविरूद्ध पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर युवतीनेही लग्नानंतर माहेरून 51 तोळे सोने आणावेत, यासाठी शारीरिक, मानसिक छळ करून घरातून हाकलून दिल्याची फिर्याद दिली आहे. त्यावरून चार वकिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही फिर्यादी कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत.

याबाबत ॲड. अभिजीत राजेश कोठारी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ‘बनावट कागदपत्रे तयार करून सरिता शेषराव साबळे हिने नाव बदलून सरिता अभिजीत कोठारी अशा नावाचे आधारकार्ड तिच्या कुटुंबियांच्या मदतीने तयार केले. सदर आधारकार्ड न्यायालयात तसेच पोलिस विभागात व इतरत्र वापरून कोठारी यांची बदनामी केली. कोठारी यांच्यासोबत लग्न झाल्याचे भासवले. तसेच इतरांशी संगणमत करून स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता पैशाची मागणी केली.’ याप्रकरणी सरिता शेषराव साबळे, सविता शेषराव साबळे, शेषराव ज्ञानदेव साबळे, सागर शेषराव साबळे, स्नेहल सागर साबळे, (सर्व रा. एमएसईबी कॉलनी, माणिकनगर, बुरूडगाव रोड, नगर) यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 420, 465, 471, 474, 500, 501, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनवणे हे करीत आहेत.

याप्रकरणी विरोधी बाजूने सरिता अभिजीत कोठारी यांनी फिर्याद दिली आहे. त्यात फिर्यादीत म्हटले आहे की, ‘माझे अभिजीत राजेश कोठारी याच्यासोबत प्रेमसंबंध होते. 30 मार्च 2019 बुरूडगाव रोड येथील महादेव मंदिरात आम्ही लग्न केले. 24 एप्रिल 2019 रोजी तो त्याच्या घरी मला घेऊन गेला. 2 मे 2019 पर्यंत व्यवस्थित नांदविले. त्यानंतर माहेरून 51 तोळे सोने आणावे. तू दिसायला चांगली नाही, असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करून सासरचे लोक उपाशीपोटी ठेवत होते. माझे वडील शेषराव साबळे यांना सांगितले. परंतु आंतरजातीय विवाह असल्याने त्यांनी दखल घेतली नाही. 6 मे रोजी अंगावरील दागिने, बांगड्या काढून घेत सासरच्या लोकांनी घरातून हाकलून दिले.’ याप्रकरणी ॲड. अभिजीत राजेश कोठारी, ॲड. राजेश मोहनलाल कोठारी, ॲड. मंगल राजेश कोठारी, ॲड. रेणू राजेश कोठारी या चौघांविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 498, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोग्यविषयक वृत्त

पेनकिलर ऐवजी ‘हे’ घरगुती उपाय करा, तत्काळ ‘रिलीफ’ मिळेल

पोटदुखीसह त्वचा आणि केसांच्या समस्यांवर ‘हे’ गुणकारी औषध, जाणून घ्या

‘ही’ ४ झाडे विविध आजारांवर उपयोगी, जाणून घ्या

‘हा’ योगा केल्याचे ४ फायदे, वेळोवेळी पाणी पिण्याची नाही गरज

‘हे’ उपाय केल्याने चेहरा होईल ‘चमकदार’ ; फेशिअलची गरज नाही

अनेक आजारांवर प्राचीन काळातील ‘हे’ २४ ‘रामबाण’ उपाय, जाणून घ्या

समृद्ध आरोग्यासाठी ‘शीर्षासन’

तळपायांना होतात हे आजार, जाणून घ्या

उलट्यांचा त्रासाने प्रवास टाळत असाल तर करा ‘हे’ ४ उपाय

लिंबू पाणी पिण्याचे ‘हे’ ७ फायदे