पिंपरी-चिंचवड शिवसेना संपर्क प्रमुखावर फसवणुकीचा FIR

पुणे/चाकण : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड संपर्क प्रमुख युवराज दाखले यांच्यावर वाकड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवराज दाखले याने अनेकांकडून प्राधीकरणातील अनधिकृत घरे अधिकृत करुन देण्याचे आमिष दाखून पैसे उकळल्याचे समोर आले आहे. दाखले याने नागरिकांकडून लाखो रुपये उकळले असल्याचा आरोप नागरिकांकडून होत असून फसवणूक झालेल्या तीन जणांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या संपर्क प्रमुखावरच गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली असून शिवसेना युवराज दाखलेवर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणी स्मिता संजय देसाई (वय ३७, राहणार बालाजी कॉलनी, इंद्रायणी नगर, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी युवराज भगवान दाखले याच्यावर १ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

युवराज दाखले हा काळेवाडी परिसरातील प्राधीकरणाची अनधिकृत घरे अधिकृत करून देण्याचे आश्वासन देऊन नागरिकांकडून 30 हजार रुपये घेत होता. तर प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार करून प्राधिकरणाच्या हद्दीमधील अनधिकृत बांधकांमांवर कारवाई करावी अशी मागणी करत होता. प्राधिकारणाने नागरिकांना नोटीस बजावल्यानंतर दाखले तुमचे घर पाडू देणार नसल्याचे आश्वासन देऊन पैसे उकळत होता. डबल गेम खेळणाऱ्या युवराज दाखलेचा पर्दाफाश झाला असून त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

युवराज दाखले हा शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांसोबत फोटो काढून आपले आणि त्यांच्यामध्ये मैत्रीचे संबंध असल्याचे नागरिकांना भासवत होता. तसेच वरिष्ठ यांनीच आपल्याला संपर्क प्रमुख केले आहे. त्यामुळे आपले राजकीय वजन वापरून तुमचे घर पाडू देणार नसल्याचे नागरिकांना सांगून दिलासा देत होता. त्या बदल्यात तो 30 हजार रुपये घेत होता. अशा प्रकारे त्याने अनेकांना गंडा घातला असून त्याची चौकशी करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. ज्या नागरिकांची अशा प्रकारे फसवणूक झाली आहे. अशा नागरिकांनी वाकड पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. पुढील तपास वाकड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक टी.एम. भोगम करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like