बाबो…! ‘या’ पुणेकर महिलेने चक्क ५० हजार रुपये एकरने चंद्रावर घेतली जमीन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – ‘पुणे तिथे काय उणे’ अशी म्हण प्रचलित आहे. या म्हणीची प्रचिती देणारी घटना पुण्यात उघडकीस आली आहे. पृथ्वीवरील जागा कमी झाली की काय म्हणून पुण्यातील एका महिलेने चक्क चंद्रावरच जमीन खरेदी केल्याचा प्रकार समोर आला आहे. चंद्रावर जमीन देण्याच्या नावावरून ५० हजार रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, चंद्रावर जमीन खरेदीबाबत महिलेने जाहिरात पाहिली. त्या जाहिरातीनुसार तिने संबंधित संस्थेकडे एक एकर जमीन खरेदीसाठी ५० हजार रुपये भरले. मात्र, काही दिवसांनी त्या महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे आता नेमकी तक्रार कोणाकडे करावी, असा प्रश्न त्या महिलेला पडला आहे. राधिका दाते वाईकर असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे.

‘कुमारी मुलगी सीलबंद बाटलीसारखी’ : ‘त्या’ प्राध्यापकाची जीभ घसरली  

तब्बल १३ वर्षांनंतर फसवणूक झाल्याचे उघडकीस 
राधिकाने १३ वर्षापूर्वी पंजाब येथील एका व्यक्तीने लुनर फेडरेशनच्या माध्यमातून चंद्रावर जागा खरेदी केल्याची बातमी वाचली. तेव्हा तिने आपल्यासाठीही जमीन खरेदीसाठी ‘त्या’ संस्थेकडे ६ नोव्हेंबर २००५ मध्ये ५० हजार रुपये जमा करून चंद्रावर एक एकर जमिनीचे बुकींग केले होते. त्यानंतर खरेदी व्यवहारानुसार संबंधित संस्थेने राधिका यांना खरेदीपत्राची बनावट कागदपत्रेही दिली होती. आता १३ वर्षांचा काळ लोटल्यानंतर राधिका यांनी त्या कागदपत्राची तपासणी केली असता आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तेव्हा त्यांनी कपाळावर हात मारून घेतला. नेमकी या प्रकरणाची तक्रार कोणाकडे करायची हा यक्ष प्रश्न राधिका यांच्यासमोर उभा आहे.