पुण्यातील ‘त्या’ २ बिल्डरविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – ठरलेल्या मुदतीत बांधकाम पूर्ण न करता ग्राहकांची फसवणूक केल्या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी दोन बांधकाम व्यावसायिकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार हिंजवडी जवळ बावधन खुर्द येथे घडला.

या प्रकरणी रणजित हेमचंद्र ओक (46, रा. पाषाण रोड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. तर मार्व्हल ओमेगा बिल्डर्स प्रा. लि.चे संचालक विश्वजित झंवर आणि महेश बन्सीलाल लड्डा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्व्हल ओमेगा या बांधकाम कंपनीची बावधन खुर्द येथे मार्व्हल सेल्हा रिज इस्टेट ही बांधकाम साईट सुरु आहे. त्या प्रोजेक्टमध्ये रणजित यांनी 2013 साली 432.05 चौरस फुटांचा एक फ्लॅट खरेदी केला. त्यासाठी रणजित यांनी बांधकाम व्यावसायिकाला 2 कोटी 29 लाख 84 हजार 200 रुपये दिले.

रणजित यांनी बावधन खुर्द येथील बांधकामासाठी दिलेले पैसे बांधकाम व्यवसायिकाने इथे न वापरता दुसरीकडे वापरले. बांधकाम व्यावसायिकाने दिलेल्या मुदतीत रणजित यांना फ्लॅटचा ताबा दिला नाही. ठरलेल्या वेळेत बांधकाम व्यावसायिकाने फ्लॅटचा ताबा न देता फसवणुक केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

हाताला ६ बोटे असणे असते फायद्याचे

मेकअप रिमूव्ह करुन झोपा नाहीतर त्वचेला होईल नुकसान

कोल्हापूरचं हृद्य धडधडतंय पुण्यात

डासांमुळे होणाऱ्या या आजारांना ‘घरगुती’ पद्धतीने घाला आळा.

Loading...
You might also like