home page top 1

आदित्य ठाकरेंचं नाव सांगून गंडा घालणारा गोत्यात

नवी दल्ली : वृत्तसंस्था – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी चोरी करणाऱ्या एका ठगाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे या आधीही या ठगाने मातोश्रीवर वस्तू देऊन अधिक पैसे घेतल्याचे समजते आहे.

१९ वर्षीय आरोपीने मातोश्रीवर पार्सल द्यायचे आहे असे सांगून तेथील कर्मचाऱ्याकडून पैसे मागितले होते.धीरज मोरे असे या तरुणाचं नाव आहे. या तरुणाने मातोश्रीवरील कर्मचाऱ्यांना युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी पार्सल मागवले आहे असे सांगून पैसे मागितल्याचे समजते.

पोलिस उपायुक्त मंजुनाथ सिंह यांनी सांगितले की मोरे यांनी यापूर्वी तीन वेळा कर्मचार्‍यांची फसवणूक केली होती आणि किमान ८५०० रुपये हडप केले आहेत. मोरेने या आधी एक कंप्युटर माईक, हेडफोन ,वही अशा वस्तूंची डिलिव्हरी देऊन जास्त पैसे उकळले होते.

चौथ्या वेळेस मोरे पुन्हा आला यावेळी मात्र कर्मचाऱ्यांनी आदित्य ठाकरेंना विचारले की ऑनलाइन काही मागवले आहे का, आदित्य ठाकरेंनी असे काहीही मागवले नसल्याचे समजताच कर्मचाऱ्यांनी मोरे यांना ताब्यात घेतले. फसवणुकी अंतर्गत मोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर मातोश्रीवरील सुरक्षा यंत्रणा आणखी सतर्क करण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like