जमीन मिळवून देण्याच्या बहाण्याने २२ लाखांची फसवणूक

हडपसर : पोलीसनामा ऑनलाईन

जप्त केलेली चारचाकी गाडी आणि जमीन लिलावाव्दारे मिळवून देण्याच्या अमिषाने एका ५३ वर्षीय महिलेची २२ लाखांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार तोडकर टाऊनशिप ससाणेनगर हडपसर येथे घडला.

अंजु वरठे (वय-५३ रा. हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली असून पोलिसांनी रविंद्र दिनकर हिरेमणी (रा. अरिहंत रेसिडेन्सी, ससाणेनगर, हडपर) याच्याविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रविंद्र हिरेमणी हा महिंद्रा कोटक बँकेत कामाला आहे. बँकेने जप्त केलेली चारचाकी गाडी आणि जमीन लिलावाद्वारे मिळवून देतो असे अंजु वरठे यांना सांगितेल. त्यांनी रविंद्र याच्यावर विश्वास ठेवून २०१४ पासून त्याला वेळोवेळी २२ लाख १० हजार रुपये दिले. पैसे देऊनही जमीन आणि चारचाकी गाडी न देता त्याने वरठे यांची आर्थिक फसवणूक केली. हडपसर पोलीस पुढील तपास करीत आहेत.