तोतया नौसेनेच्या अधिकाऱ्याला चतु:श्रृंगी पोलिसांनी केली अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

भारतीय नौसेनेचा पोशाख घालून आपण नौसेनेत अधिकारी असल्याचे सांगणाऱ्या भामट्याला चतु:श्रृंगी पोलीसंनी सापळा रचून अटक केली. ही कारवाई आज (गुरुवार) औंध येथील सिद्धार्थनगर येथील शैलेश टॉवरच्या पार्कींगमध्ये दुपारी चारच्या सुमारास करण्यात आली.

राजन जनार्दन शर्मा (वय-२३ रा. सिद्धार्थनगर, शैलेश टॉवर, औंध, मुळ रा. पश्चिम बंगाल) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक दादासाहेब हनुमंत काळे यांनी फिर्याद दिली आहे.
[amazon_link asins=’B0798R8SZH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3bd880e2-90f2-11e8-bed0-e7759ec7e5cb’]

राजन शर्मा नावाचा तरुण भारतीय नौसेनेचा पोशाख घालून आपण भारतीय नौसेनेचा अधिकारी असल्याचे सांगत आहे अशी माहिती महाराष्ट्र एटीएसचे पुणे युनिटचे सहायक पोलीस निरीक्षक पाटील यांना समजले. मिळालेली माहिती त्यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात जाऊन सांगितली. चतु:श्रृंगी पोलिसांनी औंध येथील सिद्धर्थनगर येथील शैलेश टॉवरच्या पार्कींगमध्ये उभ्या असलेल्या शर्माला ताब्यात घेऊन चौकशी केली.

चौकशी दरम्यान त्याने आपण भारतीय नौसेनेचा अधिकारी नसल्याचे सांगितले. चतु:श्रृंगी पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली. झडतीमध्ये नेव्ही असे लिहलेली ७० हजार रुपयांची एक पल्सर(जीए ०८ एजी ७८७९), दोन हजार रुपयांचा भारतीय नौसेनेचा गणवेश त्यामध्ये दोन शर्ट, एक पॅन्ट, दोन कॅप व भारतीय नौसेनेचे वेगवेगळे १२ बॅचेस, दोन भारतीय नौसेनेची ओळखपत्र आढळून आले. पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संदेश केंजळे हे करीत आहेत.